महाराष्ट्र मुंबई

विरोधकांनी शरद पवारांपासून सावध रहायला हवं- शिवसेना

मुंबई | नेतृत्व आपल्याकडे नसेल तर तिसरी आघाडी ‘प्रॅक्टिकल’ नाही, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं होतं. त्यावर शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून शरद पवार आणि भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. 

भाजपला जे बोलायचे ते विरोधी पक्षाकडून वदवून घेतले जात आहे. शरद पवारांचा ‘सडेतोड’ बाणा त्याच पठडीतला असेल तर विरोधकांनी सावध राहायला हवे, असं अग्रलेखातून म्हटलं आहे.

दरम्यान, गुजरात आणि कर्नाटकात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी आणि भाजपला घाम फोडला, हे सत्य विरोधक जेवढ्या लवकर स्वीकारतील तेवढं लोकशाहीसाठी बरं होईल, असा सुचक टोलाही लगावला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –

-एकदा हे राज्य हातात देऊन तर बघा, कोणी रडताना दिसणार नाही- राज ठाकरे

-भारताला बुलेट ट्रेनची गरज नाही, रेल्वेला सक्षम करा- मेट्रो मॅन

-ट्रोल झाल्यानं सुषमा स्वराज दुःखी; ट्विटरवर घेतला पोल

-अॅट्रॉसिटी कायद्याचा मराठा समाजाकडूनच गैरवापर- रामदास आठवले

-मी तयार पण प्रकाश आंबेडकरच म्हणतात नाही- रामदास आठवले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या