बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लहान मुलांसोबतचा ओरल सेक्स गंभीर गुन्हा नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

प्रयागराज | लहान मुलांसोबत होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एका लहान मुलासोबत घडलेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. लहान मुलांसोबत ओरल सेक्स हा गंभीर लैंगिक अत्याचार नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे.

पॉक्सो कायदा 4 अंतर्गत अशाप्रकारचा गुन्हा दंडणीय असल्याचं उच्च न्यायालयाने मान्य केलं पण हे कृत्य गंभीर लैंगिक अत्याचार नसल्याचंही उच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलं आहे. त्यामुळे अशा प्रकरणात पॉक्सो कायद्याच्या कलम 6 आणि 10 अंतर्गत शिक्षा होऊ शकत नाही, असं निरिक्षण नोंदवून घेत सदर प्रकरणातील दोषीची शिक्षाही न्यायालयाने कमी केली.

या प्रकरणातील दोषीला सुनावण्यात आलेली 10 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा न्यायालयाने 7 वर्षांपर्यंत कमी केली असून या दोषीला 5 हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. लहान मुलांसोबत ओरल सेक्स हे कलम 5/6 किंवा पॉक्सो कायदयाच्या कलम 9/10 च्या कक्षेत येत नसून पॉक्सो कायद्याच्या कलम 4 अंतर्गत दंडणीय असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

सदर प्रकरणातील आरोपी तक्रारदाराच्या घरी गेला आणि त्याच्या 10 वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन गेला. या 10 वर्षाच्या मुलाला 20 रूपये देत त्याच्यासोबत ओरल सेक्स केल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता. या प्रकरणातील सुनावणीदरम्यान लहान मुलांसोबत ओरल सेक्स हा गंभीर गुन्हा नसल्याचा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने सुनावला आहे.

थोडक्यात बातम्या-

मुलांना नाश्त्यासाठी ब्रेड आणि जाम देताय तर सावधान! ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

येरवडा कारागृहात आमदार चक्क चावला कैद्याला, जखमी कैदी रुग्णालयात दाखल

क्रांती रेडकरच्या ‘त्या’ कथित चॅटचे स्क्रिनशॉट नवाब मलिकांनी केले शेअर

“तेव्हा भाजप सत्तेत असती तर काश्मीर, जूनागढ, हैद्राबाद संस्थानांना पाकिस्तानला जा असं…”

“परिवहन मंत्री केवळ मुख्यमंत्र्यांचे कलेक्टर आहेत”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More