बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी

मुंबई | गुरुवारी सतत 12 तास पाऊस झाल्याने मुंबईतील रस्त्यांवर पाणी साचले होते. आता हवामान विभागाने मुंबईसह कोकणात ऑरेंज अलर्ट लागू केला आहे. कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, मुंबई उपनगरांसह कोकणामध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्याता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि वसई विरारमध्येही पावसाचा जोर वाढला होता. यानंतर पुढील चार ते पाच दिवसांमध्ये संपुर्ण राज्यात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून मुंबई महापालिकेला अलर्ट, तर कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल गुरुवारी मध्यरात्री मुंबईत पाऊस थांबला होता. मात्र सकाळा काही वेळातच पुन्हा पावसाला सुरुवात झाली.

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांत सध्या जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे. अंधेरी, गोरेगाव, बोरीवली, वांद्रे, कुर्ला, सायन, दादर आणि मुलु्ंड या सर्व परीसरांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. तसेच अंधेरी आणि हिंदमाता परीसरांसारख्या काही सखल भागांत पाणी साचलं आहे.

रस्त्यांवर पाणी साचल्याने रस्ते वहातुकीवर परीणाम झाला. विरार, नालासोपारा आणि वसईसारख्या सखोल भागात पाणी साचायला लागल्याने महापालिकेच्या नालेसफाईचा दावा फोल ठरल्याचं पहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘भाजपला अटलजींच्या विचारांची गरज’; ‘सामना’तून भाजपवर टीकेचे बाण

“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे कळल्यावर मी गादीवर दणादणा उड्या मारल्या”

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

‘एकनाथ शिंदेजी अभिनंदन, पण…’; शुभेच्छा देत राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना इशारा

एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More