बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पर्यटनासाठी जाणार असाल तर जरा थांबा, ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई | पावसाळा सुरु झाला की निसर्गप्रेमी आणि पर्यटनहौशी (Tourist) लोक लगेच पर्यटनावर निघतात. परंतु पावसाची वा हवामानाची पुरेशी माहिती नसल्याने त्यांची पंचाईत होते. त्यामुळे पर्यटक अनेकदा पर्यटन स्थळी देखील अडकतात. तुम्हाचा पण पर्यटनासाठी जाण्याचा मनसूबा असेल तर थोडे थांबा, व आपण जाणार असलेल्या जागेची थोडी माहिती घ्या.

भारतीय हवामान खात्याने (IMD) (दि 11) रोजी पुणे, मुंबई, रायगड आणि सातारा जिल्ह्यातील घाट भागांत मुसळधार पावसाचा (Heavy Rain Alert) अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार या जिल्ह्यांना रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील घाट विभागातील डोंगरमाथ्यावर सोमवारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेले तीन चार दिवस सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याने वाहतुकीसाठी (Transportation) रस्ते बंद केले आहेत.

कोकणात अतीमुसळधार पावसामुळे नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली आहे. व त्यामुळे अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक डोंगरांंमध्ये आणि धबधब्यांवर जायला पसंती देतात. तर प्रशासनाने हा प्रवास टाळण्याचे आव्हान नागरीकांना केले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कळसूबाई (Kalsubai) शिखरावर गिर्यारोहणासाठी गेलेले 100 हून अधिक पर्यटक कृष्णवती नदीला पूर आल्याने अडकून पडले होते. त्यानंतर स्थानिक नागरीकांनी त्यांची सुटका केली.

दरम्यान, भीमाशंकर परीसरात काही ट्रेकर्स बेपत्ता झाले आहेत. अतीवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटकांनी काळजी घेण्याचे तसेच मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने पर्यटकांनी डोंगराळ भागात न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तर ठाणे आणि मुंबईत ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला असून पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या – 

बंडखोर आमदार संतोष बांगर यांच्या यू-टर्ननंतर उद्धव ठाकरे आक्रमक, केली ‘ही’ मोठी कारवाई

गोव्याच्या राजकीय वातावरणात बिघाड, सोनिया गांधींनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

‘नामांतराविषयी आमच्याशी चर्चा झाली नाही’, शरद पवारांचा खळबळजनक खुलासा

‘आज खऱ्या अर्थाने मी तणावमुक्त झालो’ -दिलीप वळसे पाटील

बंडखोर आमदारांविरोधातील याचिकेवर आज सुनावणी नाही?, अत्यंत महत्त्वाची समोर

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More