बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

किरीट सोमय्यांना कोल्हापूरच्या वेशीवरच अडवलं जाणार?, जिल्हा प्रशासनाने दिले जमावबंदीचे आदेश

मुंबई | सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. नुकतंच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे कार्यकर्ते किरीट सोमय्या यांंच्या विरोधात आक्रमक झाले आहेत.

अशातच आज किरीट सोमय्या कोल्हापूरातील सेनापती संताजीराव घोरपडे कारखान्याची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत. पाहणीनंतर ते पत्रकार परिषद घेऊन ग्रामविकासमंत्री यांच्यावर घोटाळ्याचा नवीन आरोप करणार आहेत. यामुळे कोल्हापूरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जमावबंदीचाआदेश दिला आहे. यामुळे किरीट सोमय्या यांना कोल्हापूरच्या वेशीवरच अडवलं जाण्याची दाट शक्यता आहे. परंतु यामुळे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षातील वाद आणखी वाढत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कालपासून कोल्हापूरात किरीट सोमय्या आणि भाजप विरोधात निदर्शने करत आहेत. काल रात्री राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोमय्यांविरोधात पायताण निदर्शन केलं होतं.

थोडक्यात बातम्या – 

‘बिग बॉस’च्या घरात कलाकारांबरोबर किर्तनकारही पाहायला मिळणार, वाचा सर्व स्पर्धकांची यादी

विराट कोहलीने घेतला आणखी एक मोठा निर्णय; चाहत्यांना धक्का

खळबळजनक! भाजपच्या माजी मंत्र्याची घरात गळफास घेऊन आत्महत्या

दुसऱ्या सत्रात चेन्नईची धमाकेदार सुरूवात; मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी पराभव

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांची बिग बॅासच्या घरात एन्ट्री

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More