बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पूरग्रस्त भागात वीज बिल वसूलीबाबत उर्जामंत्र्यांचे ‘हे’ आदेश

मुंबई | महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच पुर्णपणे संसार उध्वस्त झाला असताना उर्जामंत्र्यांनी महावितरणला वीज बिल वसूलीबाबत महत्वाचे आदेश दिले आहेत. तसेच त्यामुळे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात बरसलेल्या पावसामुळे जिवीत व वित्तहानी झाली व जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे सरकारकडुन आर्थिक मदतीच्या अपेक्षेत असलेल्या नागरिकांना आता उर्जा विभागाकडुन मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असून उर्जामंत्र्यांनी पुरग्रस्त व नुकसानग्रस्त भागातील वीज बिल वसुली थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

अद्याप सरकारतर्फे आर्थिक मदतीची घोषणा केली जात नसताना उर्जामंत्री वीज बिल माफ करणार का? याबाबत चर्चा सुरू असतानाच तात्काळ स्वरूपात वसूली थांबवण्याचे निर्देश नितीन राऊत यांनी उर्जा विभागाला दिले आहेत. तसेच वीज बिल माफीबाबत अजुन कोणताही निर्णय झाला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

वीज बिल माफीबाबतचा निर्णय मंत्रिमंडळात घेतला जाईल, असं उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी बोलताना म्हटलं आहे. दरम्यान, सततच्या नैसर्गिक संकटांमुळे उर्जा विभागात आपत्ती व्यवस्थापन विभाग करणार असल्याचं राऊतांनी सांगितलं. उर्जा मंत्री नितीन राऊत आज चिपळूण दौऱ्यावर असताना ते बोलत होते.

थोडक्यात बातम्या

पतीच्या बेडरुममध्ये दुसऱ्या महिलेला पत्नीने रंगेहाथ पकडलं अन् घडला अनपेक्षित प्रकार!

पुण्यासह ‘या’ 10 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी; कोकणातही पाऊस परतणार?

“मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे”

सलग तीन दिवस सोन्याच्या दरात मोठी वाढ, वाचा ताजे दर

फुकट बिर्याणी पुुण्यातील महिला डीसीपींच्या अंगलट; गृहमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More