मोठी बातमी! आमदार रोहित पवारांना धक्का, अडचणी आणखी वाढणार

Rohit Pawar

Rohit Pawar | महाराष्ट्रातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणी वाढणार आहेत. कारण, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. रोहित पवार यांच्यावर भाजप आमदाराने गंभीर आरोप केले आहेत. यानंतर राहुल नार्वेकर यांनीही या प्रकरणावर अधिक लक्ष देत थेट चौकशीचे आदेश दिले आहेत. सत्ताधारी पक्षातील आमदाराने केलेल्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

भाजप आमदार राम कदम यांनी रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. समाजात द्वेष निर्माण करणाऱ्या एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला सोडून देण्यासाठी रोहित पवार यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे.

महाराष्ट्रात जातीवाद निर्माण करणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना या मातीत गाडणार असं त्यातला व्यक्ती म्हणत आहे. देवेंद्र फडणवीसांसारखं महाराष्ट्रातले ब्राह्मण 3 मिनिटांत संपवून टाकू, अशी धमकीच या व्हिडीओत एक व्यक्ती देताना दिसत आहे. याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित पवारांच्या चौकशीचे आदेश

या प्रकरणात ज्या व्यक्तीला पकडण्यात आलंय त्याला सोडवण्यासाठी रोहित पवार यांनी पोलिसांना फोन केल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे. योगेश सावंत असं या व्यक्तीचं नाव असून त्याचा आणि रोहित पवार यांचा संबंध काय?, असा सवालही यावेळी राम कदम यांनी केला. आज (29 फेब्रुवारी) विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सभागृहात पाँईट ऑफ इन्फॉर्मेशनच्या अंतर्गत भाजप आमदार राम कदम यांनी हे आरोप केले आहेत.

राम कदम यांनी हा मुद्दा मांडल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी थेट रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. कालच्या चर्चेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी केली जाईल, असे आदेश देण्यात आले. तर आज आमदार रोहित पवार यांना टार्गेट करत त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. आता यावर शरद पवार गट काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष असेल.

News Title :  Order of inquiry against Rohit Pawar 

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांना दहा टक्के आरक्षण मान्य पण…

नशेत धूत होऊन सलमान पोहोचला सेटवर, डायरेक्टरनं केलं असं काही की..

“लग्नानंतर व्यक्ती कधीही..”, कॅटरिनासोबतच्या नात्यावर विकी कौशलचा मोठा खुलासा

अभिनेत्री दीपिका पादुकोणने दिली मोठी गुड न्यूज; पोस्ट करत म्हणाली..

अफाट यश मिळवायचंय?, मग ‘या’ गोष्टी कायम लक्षात ठेवा!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .