बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात संध्याकाळी ६ नंतर सारं काही बंद, मात्र फूड डिलिव्हरीसंदर्भात ‘हा’ मोठा निर्णय

पुणे | वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात लॉकडाऊन लागणार की आहेत ते निर्बंध अधिक कठोर होणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. लॉकडाऊन नको अशी भूमिका गेल्या काही दिवसांपासून सर्वच स्तरातून घेतली जात होती. पालकमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत या सर्व गोष्टींचा विचार करुन निर्णय घेण्यात आला असून लॉकडाऊन न लावता पुण्यातील निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत.

पुण्यात ३ एप्रिलपासून संध्याकाळी ६ ते सकाळी ६ या वेळात संचारबंदी लावण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापनं बंद ठेवण्यात येतील. गर्दीची होणारी ठिकाणं म्हणजेच पीएमपीएल बससेवा, मॉल, हॉटेल तसेच धार्मिक स्थळं पुढील सात दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत.

हॉटेल बंद असली तरी फूड डिलिव्हरीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे. विशेष बाब म्हणजे संध्याकाळी ६ वाजेनंतर सर्व आस्थापना बंद करण्याचा आदेश असताना फूड डिलिव्हरीला मात्र परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे घरी बसल्यावर संध्याकाळी ६ नंतर देखील फूड ऑर्डर करणं आता शक्य होणार आहे.

अनेक आयटी कर्मचारी तसेच बॅचलर्स संध्याकाळच्या वेळी ऑनलाईन फूड ऑर्डर करत असतात, त्यामुळे फूड डिलिव्हरीला संध्याकाळी ६ नंतर बंदी घातली असली तर या लोकांचे मोठे हाल झाले असते, याशिवाय कोरोनामुळे आधीचं कंबरडं मोडलेल्या हॉटेल व्यवसायाला देखील मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे यासंदर्भात काय निर्णय होतो याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. अखेर पालकमंत्र्यांच्या बैठकीत यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

मोठी बातमी! पुढील 7 दिवसांसाठी पुण्यातील PMPML बससेवा राहणार बंद

पुण्यात आता लॉकडाऊनवजा निर्बंध; वाचा महत्त्वाची नियमावली

राज्यात अंशत: लॉकडाऊनची शक्यता; ठाकरे सरकारमधील मंत्र्याने सांगितली ‘अंदर की बात’!

पुण्यात कोरोनाचा कहर, लॉकडाऊनसंदर्भात अजित पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More