Ajit Pawar | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी मोठा दिलासा मिळाला आहे. आयकर विभागाने 6 डिसेंबर 2021 रोजी बेनामी मालमत्ता प्रकरणात जप्त केलेली अजित पवार (Ajit Pawar) यांची मालमत्ता ही मुक्त केली आहे. दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाने याबाबतचा निर्णय दिलाय.
तसेच, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याशी सबंधित जप्त मालमत्ताही कोर्टाने मोकळी केली. त्यामुळे अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांनाही दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी आता राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
सुनेत्रा पवार व पार्थ पवार यांना दिलासा
2021 साली अजित पवार व त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित असलेल्या काही कथित कंपन्यांवर आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आले होते. तेव्हा काही कागदपत्रे आणि मालमत्ता जप्त करण्यात आली होती.याच प्रकरणी अजित पवार (Ajit Pawar) कुटुंबाला दिलासा मिळालाय.
न्यायाधिकरणाने पवार कुटुंबियांविरोधातील आरोप फेटाळून लावताना आपल्या निर्णयात, नमूद केले की, “सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कोणतीही अनियमितता आढळली नाही. अपीलकर्त्याने सादर केलेल्या कागदपत्रांमधून त्यांनी कोणताही बेनामी व्यवहार केलेले दिसत नाही. या प्रकरणातील मालमत्तेसाठी सर्व व्यवहार कायदेशीर तसेच बँकिंग प्रणालीद्वारे केले गेले आहेत.”
नेमकं प्रकरण काय?
महाविकास आघाडीचे सरकार असताना अजित पवार उपमुख्यमंत्री होते तेव्हा ऑक्टोबर 2021 मध्ये आयकर विभागाने बेनामी मालमत्ता प्रतिबंधक कायद्यांतर्गत एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त केली होती. यामध्ये अजित पवार यांचे नातेवाईक, बहिणी आणि जवळच्या सहकाऱ्यांसह त्यांच्याशी संबंधित लोकांची निवासस्थाने आणि कार्यालये यांची झडती घेण्यात आली होती. (Ajit Pawar)
News Title – Order to release property of Ajit Pawar
महत्त्वाच्या बातम्या-
आठवड्याच्या शेवटी गुड न्यूज; तब्बल ‘इतक्या’ हजारांनी सोनं झालं स्वस्त
हिंदुत्ववादावरून ठाकरे गट-कॉँग्रेसमध्ये जुंपली, ट्वीटरवर मोठा राडा
जरांगे पाटलांची फडणवीस सरकारला नवीन डेडलाईन; थेट इशारा देत म्हणाले…
आज शनिवारी, महादेव ‘या’ राशींवर करणार सुखाचा वर्षाव!
भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन!