बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ महापालिका हद्दीतील शिक्षकांना घरून काम करण्याचे आदेश!

मुंबई | कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षकांना बुधवारपासून घरून काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नसल्याचं चित्र दिसून आल्यानंतर महापालिकेने 50 टक्के शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती.

मुंबईत कोरोनाच्या संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं पाहायला मिळत असल्याने मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी एक परिपत्रक काढून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना घरी राहून ऑनलाइन विद्यार्थ्यांना धडे देण्याच्या सूचना केल्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या वर्गाव्यतिरिक्त शालेय पोषण आहार अंतर्गत धान्याचे वितरण करण्यासाठी कर्मचारी किंवा शिक्षकांची गरज भासल्यास त्या संदर्भातील निर्णय शाळा व्यवस्थापन समिती किंवा मुख्याध्यापक परस्पर घेऊ शकतात. यापूर्वीही बऱ्याच शिक्षक संघटनांनी कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने घरून काम करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती.

आता पन्नास टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहण्याची परवानगी काढून सरसकट सर्वांना घरून काम करण्याची परवानगी महापालिकेतर्फे देण्यात आली आहे. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येईपर्यंत हा आदेश महापालिका हद्दीतील सर्व शाळांना लागू असेल. तसेच नियमांचं पालन न झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचंही शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या –

महाराष्ट्रासाठी आरोग्यमंत्र्यांची केंद्र सरकारकडे ‘इतक्या’ कोटी लसींची मागणी!

जाणून घ्या…महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी

पुणे विभागीय आयुक्तांना कोरोनाची लागण; नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन!

पुणे शहरातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी

मोठी बातमी! पुण्यामध्ये कोरोना लस घोटाळा; तब्बल इतक्या हजार लसी गायब

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More