बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कळवण्यात येते की…’; शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिले ‘हे’ आदेश

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना नुकताच रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांना घरीच आराम करण्याचा सल्ला डाॅक्टरांकडून देण्यात आला आहे. त्यानंतर आता शरद पवार घरातच बसून सुत्र फिरवताना दिसत आहेत. सोमवारी पवारांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेतला होता. तर पवारांचं सर्व राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर लक्ष असल्याचं दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्तांना आदेश दिले आहेत.

कोव्हिड- 19 या जागतिक महामारीची दुसरी लाट संपूर्ण राज्यात पसरली आहे. दिवसेंदिवस रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. राज्यशासन, पोलीस व प्रशासकिय यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील कळविण्यात येते की, त्यांनी देखील जनतेला ह्या अभूतपूर्व संकटांतून बाहेर काढण्यासाठी स्थानिक स्तरावर स्वतःला झोकून द्यावे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबवण्यावर विशेष भर द्यावा.

राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. त्याकरिता रक्तदान शिबीरांचे कार्यक्रम देखील हिरीरीने राबवावेत. मला खात्री आहे की, आपण धीर,संयम, दक्षता आणि परस्पर सहकार्याच्या बळावर ह्या महामारीवर निश्चित मात करू शकू, असं ट्विट शरद पवारांनी केलं आहे. तर आदेशाच पत्र देखील काढण्यात आलं आहे.

दरम्यान, कोरोना महामारीने राज्यात गंभीर रूप धारण केलं आहे. भुकंप, महापूर आणि इतर संकंटात ज्याप्रकारे पक्ष कार्यकर्ते धावून जातात त्याप्रमाणे कोरोनाच्या संकटात देखील पक्ष कार्यकर्ते मागील काळात काम करताना दिसत होते. आता राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला असल्यानं पवारांनी काम करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या-

‘ब्रेक दि चेन’ मोहीमेअंतर्गत महाराष्ट्र सरकारची नवी सुधारीत नियमावली जाहीर, वाचा सविस्तर

भुकंपाच्या झटक्यानं ‘ही’ चार राज्यं हादरली; पंतप्रधान मोदींनी घेतली फोनवरून माहिती

दिलासादायक! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; जाणुन घ्या आकडेवारी

अनिल देशमुख नवी दिल्लीत दाखल, ‘या’ बड्या लोकांना भेटल्याची माहिती

“साधूंची हत्या आणि स्त्रीचा अपमान करेल त्याचा पराभव निश्चित आहे”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More