बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्याला तातडीने शिथिलता देण्याचे आदेश काढावेत; महापौरांची राज्य सरकारकडे मागणी

पुणे | कोरोना महामारीचा धोका कमी होऊ लागल्याने राज्य सरकारने हळूहळू नियमांमध्ये शिथिलता देत अनलॉक सुरु केलं आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात आलं आहे. अशातच आता पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याला देखील तातडीने शिथिलता द्या, अशी मागणी केली आहे.

माध्यमांशी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, शहराचा पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांच्या खाली आला आहे. शहरातील कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. यामुळे गेल्या 15 दिवसांपासून सातत्याने आम्ही राज्य सरकारकडे पुणे शहराला शिथीलता देण्यासंदर्भात मागणी करत आहोत. मात्र, त्यावर राज्य सरकार काहीही निर्णय घेत नाही.

गेल्या एक महिन्यापासून पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट पाचच्या खाली आहे. पाचच्या खाली पॉझिटिव्हीटी रेट असल्यास शहर लेव्हल 2 मध्ये असेल, असं सरकारडून सांगण्यात आलं आहे. अशाप्रकारे गेल्या महिनाभरापासून पुणे शहर सातत्याने लेव्हल 2 मध्ये आहे. पालकमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत देखील हा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, तरीही शहराला शिथीलता देण्यामध्ये का उशिर होतोय हे माहित नाही, असं देखील मोहोळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आज दुकानांच्या वेळा वाढवण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आज संध्याकाळपासून ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या कमी आहे त्या जिल्ह्यांमध्ये दुकानेे 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.

थोडक्यात बातम्या –

नारायण राणेंनी सेना सोडली तेव्हा संजय राऊत बाथरूममध्ये लपले होते- नितेश राणे

एकीकडे ठाकरे-फडणवीसांची भेट, तर दुसरीकडे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

‘एक आई म्हणून तुम्हाला विनंती करते…’; राज कुंद्रा प्रकरणी शिल्पा झाली व्यक्त!

बाबो! ‘या’ माजी मंत्र्याने केली तब्बल 6 लग्न, पत्नीनेच केला गुन्हा दाखल!

उत्तर प्रदेशमध्ये कुठेही गेलात तर तुम्हाला फक्त विकास दिसेल- अमित शहा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More