बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशातील मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढला

मुंबई | मराठा विद्यार्थ्यांसाठी मेडिकलमधील पदव्युत्तर प्रवेशासाठी राज्य सरकारने अखेर अध्यादेश काढला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

निवडणूक आयोगाच्या परवानगीनेच हा अध्यादेश काढण्यात आला आहे. तसेच सहीसाठी अध्यादेश राज्यपालांकडे पाठवण्यात येईल, असं पाटील म्हणाले आहेत.

अ‌ॅडमिशनची मुदत वाढवून मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. प्रवेशाची मुदत 25 ऐवजी 31 मेपर्यंत वाढवून द्यावी, अशी मागणी केली असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

जागा वाढवून देण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला असल्याचंही त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

-कमल हसन यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; म्हणतात…

-भाजप नेत्याने केली राजीव गांधींची नथूराम गोडसेसोबत तुलना

-भाजपच्या तीन वाचाळवीरांना दणका; पक्षाने केली ‘ही’ कारवाई

-मतांसाठी प्रियांका गांधी अमेठीत नमाज पठण करतात; स्मृतींचा प्रियांकांवर घणाघात

-ते वादग्रस्त ट्वीट मी केलंच नाही; अनंतकुमार हेगडेंचं स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More