महाराष्ट्र मुंबई

दहावीचा भूगोलाचा पेपर न घेता सरासरी गुण द्या; सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

Loading...

मुंबई | लॉकडाउनमुळे इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा राहिलेला पेपर न घेता विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात यावे अशी मागणी भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे सुधीर मुनगंटीवार यांनी ही मागणी केली. दहावीचा भूगोलाचा पेपर 23 मार्च रोजी घेण्यात येणार होता. मात्र कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा पेपर रद्द करण्यात आलाय.

सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे तसंच करोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे तो पेपर घेणं शक्य नसल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी येत्या 4 दिवसांत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन वर्षा गायकवाड यांनी दिलं आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय यापूर्वी  घेण्यात आला आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

आमदारांच्या वेतनातील 30 टक्के कपातीला ठाकरे सरकारची मंजुरी

‘भीकेत मिळालेल्या आमदारकीचा वापर’; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

महत्वाच्या बातम्या-

उद्धवा महाराष्ट्र तुझ्या खांद्यावर उभा आहे बेटा- सिंधुताई सपकाळ

‘तुम्ही आम्हाला अडवलं का?’; औरंगाबादमध्ये दुचाकीस्वारांकडून पोलिसांना मारहाण

अनंत करमुसे मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच जणांना अटक

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या