Gene Hackman | हॉलिवूड (Hollywood) अभिनेते जीन हॅकमन (Gene Hackman) (९५) आणि त्यांची पत्नी बेट्सी अराकावा (Betsy Arakawa) न्यू मेक्सिको (New Mexico) येथील राहत्या घरी मृतावस्थेत आढळले. बुधवारी ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. १९६० च्या दशकात चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेईपर्यंत हॅकमन यांनी विविधरंगी भूमिका साकारल्या होत्या.
चित्रपटातील भूमिकांसाठी प्रसिद्ध
हॅकमन यांना ‘द फ्रेंच कनेक्शन’ आणि ‘अनफॉरगिव्हन’ या चित्रपटांमधील भूमिकांसाठी ऑस्कर पुरस्काराने (Oscar Award) सन्मानित करण्यात आले होते. ‘सुपरमॅन’ चित्रपटात त्यांनी साकारलेली खलनायकाची भूमिका देखील लोकप्रिय ठरली होती.
सांता फे काउंटी शेरीफच्या (Santa Fe County Sheriffs) कार्यालयाचे प्रवक्ते डेनिस अविला यांनी सांगितले की, पोलिसांनी बुधवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी १:४५ वाजता घराची तपासणी केली असता, हॅकमन आणि त्यांची पत्नी, त्यांच्या कुत्र्यांसह मृतावस्थेत आढळले.
तपास सुरु
अधिकाऱ्यांनी त्यांच्या मृत्यूच्या कारणाबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. जीन हॅकमन हे चित्रपटसृष्टीतील एक आदरणीय अभिनेते होते, आणि त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीची मोठी हानी झाली आहे.
Title : Oscar-Winning Actor Gene Hackman and Wife Found Dead