बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माणुसकीला काळीमा फासणारी घटना! सलग 5 तास कोरोनाबाधीताचा मृतदेह रूग्णालयाबाहेर होता पडून

उस्मानाबाद | कोरोना संकटाच्या काळात माणसांची दोन रूपं आपल्याला दिसून आलीत. यामध्ये काहींच्या कृतीतून माणुसकीचं दर्शन झालं तर काहींनी मयताच्या टाळूवरचं लोणी खाल्लं, असं अनेक घटनांमधून समोर आलं. अशाच प्रकारे उस्मानाबादमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका कोरोनाबाधीता मृतदेह सलग 5 तास पडून होता ना कोणी पुढं आलं ना कोणाला त्याची दया आली.

छगन मेसबा सोनटक्के असं मृत व्यक्तिचं नाव आहे. छगन सोनटक्के हे ‘किणी’ गावचे रहिवासी होते. 3 मे रोजी सकाळी ते तेर येथील बसस्थानकाजवळील एका खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी आले होते. यावेळी या दवाखान्यातील डाॅक्टरांनी तपासणी करून सोनटक्के यांना शासकीय रूग्णालयात जायला सांगितलं. त्यानंतर ते बाहेर येत असताना दरवाजासमोर ते कोसळून खाली पडले आणि पडल्यावर त्यांचा जागीच मृत्यु झाला.

या घटवेची माहिती ढाकी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा केला, पंचनाम्यानंतर सोनटक्केंची तेरच्या ग्रामीण रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी खासगी दवाखान्यासमोरच रँपीड अँन्टीजन टेस्ट केली. त्यात सोनटक्के कोरोना पॉझिटिव्ह आढळले. चाचणीनंतर सोनटक्के यांचा सुमारे पाच तास मृतदेह बेवारस अवस्थेत पडून होता.

दरम्यान, दोन वाजता नातेवाईकांच्या मदतीने तेर ग्रामीण रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मृतदेह पीपीई कीटमध्ये घातला. एवढ्यावरच मृतदेहाची हेळसांड थांबली नाही. यावेळी मृतदेह घेऊन जाण्यासाठी नातेवाइकांना वाहन सुध्दा लवकर मिळालं नाही. त्यानंतर घंटा गाडीत मृतदेह घेऊन जाण्यात आला असल्याची माहिती मिळाली.

थोडक्यात बातम्या- 

सीटी स्कॅनमुळे कॅन्सर होण्याचाही धोका संभवतो मग सीटीस्कॅन करावं की नाही?, तात्याराव लहाने म्हणाले….

“बंगालची वाघीण जिंकली म्हणणारे आता मूग गिळून गप्प का आहेत?”

“महाराष्ट्राला दररोज 8 लाख लसींची गरज पण मिळतात फक्त…”

येत्या काही तासात या ‘6’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; शेतकऱ्यांसाठी खबरदारीच्या सूचना

“शुल्क भरलं नाही म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवता येणार नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More