देश

प्रख्यात गझलकार आणि कवी-गीतकार राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली | देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती, तर अनेक दिग्गजांनाही या रोगाचा सामना करावा लागला आहे.

प्रसिद्ध हिंदी आणि उर्दू शायर व गीतकार राहत इंदौरी यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी स्वत:च याबद्दल सोशल मीडियातून माहिती दिली आहे.

मला कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यामुळे टेस्ट केली. त्यामध्ये माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे मी ऑरबिंदो हॉस्पीटल येथे उपचारासाठी दाखल झालो आहे, अशी माहिती राहत इंदौरी यांनी दिली आहे.

फेसबुक आणि ट्विटरवरुन आपणास माझ्या प्रकृतीची माहिती देतच राहिल. आपल्या प्रार्थनांची गरज आहे. कृपया, कुणीही मला किंवा कुटुंबीयांना फोन करु नये, असं आवाहन राहत इंदौरी यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“मला न्यूझीलंडला जाऊन रहायचंय, तिथं देवी जागृत आहे”; ‘या’ मराठी दिग्दर्शकाच्या वक्तव्यानं खळबळ

भारतात लॉकडाऊनच्या काळात ‘या’ देशी डेटिंग अ‌ॅपने डाउनलोडिंगमध्ये ओलांडला 1 कोटींचा आकडा

लॉकडाऊनच्या काळात भारतात लोकांनी गुगलवर जास्त प्रमाणात केलं ‘हे’ सर्च…

‘त्या’ मुलाच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च पार्थ पवारांनी उचलला; सोबतच दिली कौतुकाची थाप!

“…आता कसे थंड पडले आहेत बघा, ही नकली शिवभक्ती काय कामाची”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या