बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेनेसारखं इतरांना जमलं नाही, म्हणून आज अनेक राज्यांमध्ये चिता पेटलेल्या दिसत आहेत”

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यात शिवसेना पक्षाच्या माध्यमातून तीन कोव्हिड सेंटर उभारले असल्याची माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. पर्यावरण मंत्री तसेच युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या सेंटरचे उद्घाटन झाले असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली आहे.

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती चांगली आहे, कारण इथे राजकीय कार्यकर्ते सरकारला समांतर अशी यंत्रणा उभी करत असल्याचं मत संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केलं. “राजकीय कार्यकर्ते पुढे येऊन काम करत आहेत आणि त्यामुळे सरकारचा भार कमी होतोय. हे इतर राज्यात झालं नाही. शिवसेनेसारखं काम इतर पक्षांना जमलं नाही. त्यामुळेच आज अनेक राज्यांमध्ये चिता पेटलेल्या दिसत आहेत”, अशा भावना संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केल्या.

आदित्य ठाकरे यांच्यासोबत पुण्यामध्ये तीन कोव्हिड सेंटरचं आम्ही उद्घाटन केलं. ते कोव्हिड सेंटर सरकारी नाहीत. ते शिवसेना पक्षाच्या माध्यमातून उभी करण्यात आली आहेत. यामुळेच महाराष्ट्राची परिस्थिती सध्या चांगली आहे, असं त्यांनी यावेळी बोलून दाखवलं.

महाराष्ट्रात मृत्यूचे आकडे लपवले जात आहेत. असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर बोलताना “देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते आहेत, त्यांचं असं वक्तव्य करणं हे विरोधी पक्षाच्या कार्याचा भाग असू शकतो. तसेच त्यांच्या आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं आहे”, असा टोला संजय राऊत यांनी यावेळी बोलताना लगावला आहे.

थोडक्यात बातम्या –

मोठ्या प्रमाणावर कैद्यांना सोडा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

“रुग्ण कमी होत आहे म्हणून सुखावून जाऊ नका”

‘कोरोना सेंटरमध्ये भरती होण्यासाठी कोरोना रिपोर्टची आवश्यकता नाही’; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आदेश

संजय राऊतांनी ममता बॅनर्जींना दिली अहिल्याबाई होळकरांची उपमा, म्हणाले…

#सकारात्मक_बातमी | सात महिन्यांच्या बाळाची कोरोनासह ट्युमरशी यशस्वी झुंज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More