“इतर राज्यांतील निकालांचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही”

“इतर राज्यांतील निकालांचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही”

बीड | तीन राज्यात अनेक वर्ष भाजपची सत्ता असून या वेळी सत्ता मिळाली नसली तरी या निकालांचा महाराष्ट्रावर काही परिणाम होणार नाही, असा दावा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे.

बीड जिल्ह्यात गोपीनाथगड येथे बुधवारी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त मोफत दोन दिवसीय आरोग्य शिबिराला सुरुवात झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

भाषण आणि अभिनय करुन वारसा येत नाही, तो रक्तातच असावा लागतो. अशा शब्दांत नामोल्लेख न करता त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना टोला लगावला आहे.

दरम्यान, काही जण या निकालावर मोठमोठी विधाने करत आहे. पण त्यांचा स्वत:चा पक्ष राज्याच्या बाहेर कोणाला माहिती तरी आहे का? असंही त्या म्हणाल्या. 

महत्वाच्या बातम्या 

-डिलिव्हरी बाॅयच्या व्हायरल व्हीडिओनंतर झोमॅटोचा ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

-राम मंदिरासाठी शिवसेना आक्रमक; लोकसभेत मांडला मुद्दा

-प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

-…म्हणून ‘हॉकी इंडिया’च्या सीईओंनी त्या खेळाडूंना चक्क हाकलून लावलं!

-महार रेजिमेंटच्या शूरवीरांचा सरकार करणार गौरव

Google+ Linkedin