बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इतर राज्यांनी महाराष्ट्र माॅडलचं अनुकरण करावं; उद्योगपतींकडून मुख्यमंत्र्याचं कौतुक

मुंबई | कोरोना काळात सामान्य माणसांसह छोट्या उद्योगपतींपासून ते मोठ्या उद्योगपतीपर्यंत सर्वांनाच संकटाला मोठा सामना करावा लागला आहे. जानेवारी ते मार्च पर्यंत उद्योगांना पुन्हा उभारी घेण्याची संधी मिळाली. परंतू कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा उद्योगधंदे बंद करावे लागले. त्यामुळे देशाला मोठा आर्थिक तोटा झाल्याचं समोर आलं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी उद्योगपतींशी चर्चा केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं उद्योजकांनी कौतुक केलं असून काही सूचना देखील दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या या बैठकीत अनेक उद्योजकांनी उद्धव ठाकरे यांचं कौतूक केलं आहे. त्यांनंतर उद्योजक हर्ष गोएंका यांनी ट्विट करुन मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. महाराष्ट्र मॉडेलचं इतर राज्यांनीही अनुकरण करायला हवं, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

कोरोना काळातही संपूर्ण काळजी घेऊन महाराष्ट्राने उद्योग चालवून दाखविले असं उदाहरण मला देशात निर्माण करायचं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आपल्याला ‘लॉकडाऊन आणि नॉकडाऊन’ दोन्ही नकोत. त्यामुळं आरोग्याचे नियम पाळत रहा, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आपण कॅलक्युलेटेड रिस्क घेत आहोत अनलॉक करताना त्यामुळे काळजी घ्या. एकदम काहीही शिथिल केलेले नाही. उद्योगांनी त्यांच्या भागात कामगार व कर्मचारी यांच्यासाठी तात्पुरत्या निवास सुविधा उभाराव्यात, तसेच वैद्यकीय व इतर आवश्यक सुविधा यांचे नियोजन करून ठेवावे, अशा सुचना देखील त्यांनी दिल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

“बर्गर, पिझ्झा, स्मार्टफोनची होम डिलिव्हिरी होऊ शकते, तर मग राशनची का नाही?”

“महाराष्ट्राला दीड कोटी लस देणार असल्यानं केंद्राची पुनावालांना तंबी, म्हणून ते लंडनला गेले”

आपापल्या भागातील परिस्थितीनुसार जिल्हा प्रशासनाने निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा- उद्धव ठाकरे

दिलासादायक! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांसह मृतांच्या संख्येतही घट, जाणुन घ्या आकडेवारी

‘या’ जिल्ह्यात 2 आठवड्यात कोरोना रुग्णांची तब्बल 13 कोटींची लूट; तपासणीत धक्कादायक माहिती आली समोर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More