सातारा | साखर कारखान्यांच्या जप्ती आदेशाला सहकार मंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. ही स्थगिती आठ दिवसांत मागे घ्यावी, अन्यथा सहकार मंत्र्यांना घेराव घालून थकित एफआरपीचे पैसे वसुल करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
सहकारमंत्री सुभाष देशमुखांनी किसन वीर कारखान्यासह राज्यातील पाच साखर कारखान्यांच्या जप्ती आदेशाला सहकार मंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आजपर्यंत थकित एफआरपी मिळू शकलेली नाही.
दरम्यान, सहकारमंत्र्यांनी येत्या आठ दिवसांत किसन वीरसह पाच कारखान्यांच्या जप्तीवरील स्थगिती उठविली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असंही शेट्टींनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-सरकार संभाजी भिडेंच्या चुकावर पांघरून घालून त्यांना संरक्षण देत आहे- अशोक चव्हाण
-मराठा आंदोलकांनी शांततेला प्राधान्य द्यावं; शरद पवारांनी केलं पत्रकाद्वारे आवाहन!
राज्यकर्ते आणि हितसंबंधी घटक मराठा आंदोलनाला बदनाम करत आहेत- शरद पवार
-हिंमत असेल तर सरकारने आरक्षणमुक्त समाज तयार करावा!
-पुजारा आऊट होताच विराटने मैदानावरच हासडली शिवी!
Comments are closed.