बंगळुरु | कर्नाटकात 20 आमदारांना प्रत्येकी 10 कोटी रुपये देऊन खरेदी करण्याचा भाजपने प्रयत्न केल्याची ऑडिओ क्लिप खोटी ठरली तर मी राजकारणातून संन्यास घेईल, असा पवित्रा कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी घेतला आहे.
येडीयुरप्पा यांची काँग्रेसच्या आमदारांसोबत संभाषण करतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे, असा आरोप काँग्रेसने केला होता पण ती क्लिप खोटी असल्याचा दावा भाजपचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी केला आहे.
संबंधित ऑडिओ क्लिप खोटी आहे आणि त्यामध्ये बोलणारे येडियुरप्पा नाहीत असे जर सिद्ध झाले तर मी राजकारणातून संन्यास घेईल, असं कुमारस्वामींनी सांगितलं आहे. ऑडिओ क्लिप समोर आली तेव्हा काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाल यांनी भाजपवर टीका केली होती.
दरम्यान, कर्नाटच्या सत्तासंघर्षाचा खेळ साऱ्या जगानं जवळून अनुभवला होता.
महत्वाच्या बातम्या-
–शिवसेना किरीट सोमय्यांनंतर पूनम महाजनांनाही ‘आस्मान’ दाखवायच्या तयारीत!
–सगळं लखनऊ झालंय प्रियांकामय! उ. प्रदेशची जबाबदारी स्विकारल्यानंतर प्रियांका पहिल्यांदाच लखनऊमध्ये
–टी-20च्या रंगतदार सामन्यात भारताचा निसटता पराभव
-मी जे बोललो त्यात औचित्यभंग ते काय?- अमोल पालेकर
-यूपीएससी करणाऱ्यांसाठी खुशखबर; आता नापास झालात तरी मिळणार नोकरी!