बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…नाहीतर ही शेवटची चड्डीही काढेन; नाशिकमधील आंदोलनाची देशभरात चर्चा

नाशिक| कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचं अक्षरशः तांडवच बघायला मिळत आहे. देशाच्या विविध भागात कोरोनाने हातपाय पसरले असून, रुग्णसंख्येचा तोल सांभाळताना आरोग्य व्यवस्था डगमगताना दिसत आहे. अशातच अनेक रुग्णालयांकडून रुग्णांची लूट सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे.

कोरोना संकट काळातही अनेक खाजगी रूग्णालयांककडून रुग्णांची लूट सुरुच आहे. अशीच एक घटना नाशिकमध्ये पहायला मिळाली. रुग्णालय डिपॉझिट म्हणून घेतलेले पैसे परत देत नसल्यानं आम आदमी पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र भावे यांनी रुग्णाच्या नातेवाईकांनासोबत घेत रुग्णालयामध्ये ‘कपडे काढो’ आंदोलन केलेलं पहायला मिळालं.

नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात एका कुटुंबातील पाच सदस्यांवर कोरोनावरील उपचार सुरू होते. यातील चार सदस्य उपचारादरम्यान दगावले आहेत. तर एक सदस्य कोरोनावर मात करुन घरी परतला. या रुग्णांचे 10 लाख रुपये मेडिक्लेम कंपनीने हॉस्पिटलला दिले होते. मात्र या दरम्यान हॉस्पिटल सेफ साईड म्हणून 1 लाख 40 हजार रुपये डिपॉजीट म्हणून घेतले होते. तसेच ते पैसे परत सुद्धा देण्यात येत नव्हते. जास्त बिल आकारणाऱ्या हॉस्पिटल विरोधात मोहीम सुरू केलेल्या ऑपरेशन हॉस्पिटल या सामाजिक चळवळीच्या टीमकडे मदत मागतली.

दरम्यान, ‘ऑपरेशन हॉस्पीटल चळवळ’ टीमसह हॉस्पिटलमध्ये धडक दिली आणि या टीमला देखील हॉस्पिटलने उडवा उडवीची उत्तरे देत पैसे देण्यास नकार दिला. या नंतर या टीमने थेट हॉस्पिटलच्या कार्यलयातच कपडे काढूत नग्न अवस्थेत आंदोलन करत पैसे मिळवून देण्याची मागणी केली. तब्बल 2 तास चाललेल्या या आंदोलनाला नंतर अखेर हॉस्पिटलने रुग्णाकडून घेतलेले डिपॉझिटचे 1 लाख 40 हजार रुपये परत केले.

 

थोडक्यात बातम्या – 

हार मानेल ती आई कसली! 2 वर्षाच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्यानं आईनं घेतला ‘हा’ निर्णय

उद्यापासून भारतात फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम होणार बंद?; जाणून घ्या

“शरद पवारांचा नातू म्हणून रोहित पवारांना वेगळा न्याय का?”

भारतातील कोरोनाचा अनुभव सांगताना ‘या’ क्रिकेटपटूला अश्रू अनावर, पाहा व्हिडीओ!

आनंदाची बातमी! पुण्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More