मुंबई | राज्यात सध्या अनेक मुद्द्यांनी गदारोळ सुरु आहे. त्यातच राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचा कलगितुरा रंगलेला पहायला मिळत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) राणा दांपत्याच्या भेटीला गेले असता शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. यानंतर भाजपने (BJP) आक्रमक भूमिका घेतलेली पहायला मिळत आहे.
किरीट सोमय्यांना झालेल्या दुखापतीवरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी शंका उपस्थित केली. यावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांत आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. अशातच आता विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्यावरुन गंभीर आरोप केला आहे.
किरीट सोमय्या या सरकारचे घोटाळे, भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत, त्यामुळं सोमय्या यांनाच नष्ट करावं अशा प्रकारचा कट या सरकारचा आहे. सीआयएसएफ होतं म्हणून किरीट सोमय्यांचा जीव वाचला. नाहीतर त्याच ठिकाणी त्यांची हत्या झाली असती, असा हल्लाबोल प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
दरम्यान, किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात कठोर कारवाई करा, अशी मागणी राज्यपालांकडे केली असल्याचं प्रविण दरेकर यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आणखीनच चिघळत चालल्याचं समोर येत आहे.
थोडक्यात बातम्या
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचं तज्ज्ञांनी सांगितलं ‘हे’ गंभीर कारण, म्हणाले….
तुरूंगातून बाहेर येताच गुणरत्न सदावर्तेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
किरीट सोमय्यांच्या वैद्यकीय अहवालातून ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर
कोरोनानंतर बर्ड फ्लूचं सावट; ‘या’ ठिकाणी माणसामध्येही आढळला H3N8 स्ट्रेन
“आपल्या खोटारड्या मालकांची पापं झाकण्यासाठी अजून किती खोटेपणा कराल?”
Comments are closed.