महाराष्ट्र मुंबई

“…नाहीतर मनसे खळ्ळ्खट्टयाक करणार”!

मुंबई | दुकानांवर इंग्रजी भाषेतील अक्षरांएवढीच मराठी अक्षरांंची पाटी लावा अन्यथा आम्ही  खळ्ळ्खट्टयाक करु असा इशारा मनसेने लालबाग-परळमधील दुकानदारांना दिला आहे. 

परळ आणि लालबाग परिसरात बऱ्याचश्या ब्रँडेड वस्तूंची दुकाने आहेत. मात्र या दुकांनावरील लावण्यात आलेल्या नामफलकांवर मराठी अक्षराचा आकार हा नेहमी लहान असतो, असं मनसेचे शाखाध्यक्ष नीलेश इंदप यांनी सांगितलं आहे.

दुकादारांनी लवकरात लवकर दोन्ही भाषेतील नामफलक हे समान आकाराचे आणि देवनागरी भाषेत लावण्याचा आवाहन करणारे निवेदन मनसेने दुकानदारांना दिलं आहे.

दरम्यान, दुकानदारांनी येत्या 15 तारखेपर्यंत आपल्या दुकानाचे नामफलक बदलून घ्यावे अन्यथा मनसे स्टाईलने दुकानदारांना उत्तर दिलं जाईल, असंही इंदप म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या-

-‘या’ मोठ्या प्रश्नावर जॉर्ज फर्नांडिस यांनी राज ठाकरेंचे कान उपटले होते!

जॉर्ज फर्नांडिस यांनी देशातील कामगार चळवळीला नवी दिशा दिली- शरद पवार

ओवैसींना मोठा झटका, प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी कोर्टाचे तपासाचे आदेश

“आमीर खान, नवज्योतसिंह सिद्धू आणि नसीरुद्दीन शहा हे गद्दार आहेत”

-राहुल गांधी यांच्यात पंतप्रधान होण्याची क्षमता; उत्तर प्रदेशच्या मंत्र्याचं वक्तव्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या