Top News अहमदनगर महाराष्ट्र

…नाहीतर शरद पवारांची जीभ घसरली असेल- राम शिंदे

photo Credit- facebook/ram shinde and sharad pawar

अहमदनगर | जेजुरी येथे अहिल्यादेवी होळकर यांचा पुण्यश्लोक पुतळा उभारण्यात आला आहे. त्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप पक्षाचे नेते राम शिंदे यांनी निशाणा साधला आहे.

शरद पवार हे राजकारणात, लोकशाहीत अर्धशतक पूर्ण करणारे नेते आहेत. त्यांच्या तोंडातून जे वाक्य गेले ते अनावधानाने गेले असेल किंवा त्यांची जीभ घसरली असेल, असं म्हणत राम शिंदेंनी शरद पवारांवर टीका केली आहे.

अहिल्यादेवी होळकर यांचा असा नामोल्लेख करणं ही गंभीर चूक असून हा अवमान असल्याचंही राम शिंदे यांनी म्हटलं आहे. अहिल्याबाईंचा जन्म राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघामध्ये झाला आहे, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचे अनुवारण झाल्यानंतर शरद पवार बोलत होते.

दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे काही दिवसांपूर्वी अनावरण केलं. त्यावेळी त्यांनी शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांवर टीका केली होती.

थोडक्यात बातम्या-

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे ‘या’ आमदाराला येत आहेत धमक्यांचे फोन!

डीजीपींनी नोकरी सोडत घेतला शेती करण्याचा निर्णय

आता मनसेच्या अमित ठाकरेंचीही शिवसेनेवर टीका, म्हणाले…

ज्युनिअर तेंडुलकरवर ‘हे’ तीन संघ लावणार बोली?

आई-वडिल घरात नसताना पाच वर्षाच्या चिमुरडीसोबत नराधमाने केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य!

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या