बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोदींनी तात्काळ राज्यपालांची उचलबांगडी करावी, अन्यथा….”

मुंबई | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल?, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल?, असं वक्तव्य राज्यपालांनी केलं आहे. राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच आता मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी राज्यपालांना इशारा दिला आहे.

महाराष्ट्राच्या राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं. छत्रपती शिवरायांबद्दल भावना, संवेदना नसतील तर त्याविषयी बोलताना त्यात नाक खुपसू नये. आपले छत्रपतींचे खरे विचार आपसूक बाहेर आले. आपलं वय आणि वक्तव्य पाहता निवृत्तीची गरज आहे, असं वाटतं, अस विनोद पाटलांनी म्हटलं आहे.

विनोद पाटील यांनी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती केली आहे. तात्काळ राज्यपालांची उचलबांगडी करावी. असे राज्यपाल महाराष्ट्राला नको. राज्यपाल महोदय आपण माफी मागावी. अन्यथा तुमच्या वयाचा विचार न करता आम्ही शिवभक्त आपले धोतर फेडण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा विनोद पाटलांनी दिला आहे.

दरम्यान, छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं, असं म्हटलं आहे.  राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरू होत्या तर रामदास हे कधीही गुरु नव्हते. हा खरा इतिहास आहे.चुकीचा इतिहास सांगितल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतप्त भावना आहेत. राज्यपालांनी आपल्या पदाची मर्यादा ठेवून वक्तव्य करायला हवं होतं, असं उदयनराजेंनी म्हटलं आहे.

पाहा ट्विट- 

थोडक्यात बातम्या- 

…म्हणून उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी संभाजीराजे भावूक, डोळ्यात अश्रू तरळले

तळीरामांचाही युक्रेनला पाठिंबा; चक्क गटारीत ओतला रशियन व्होडका, पाहा व्हिडीओ

‘नवाब मलिक चांगला माणूस, त्यांना अटक व्हायला नको होती’; केंद्रीय मंत्र्यांचं वक्तव्य

युक्रेनच्या संरक्षणासाठी ‘ही’ सुंदरी उतरली मैदानात, पाहा फोटो

“30 हजारांमधून फक्त 900 विद्यार्थ्यांना युक्रेनमधून आणलंय, फार मोठा तीर नाही मारला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More