बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…अन्यथा मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही”

कल्याण | गेल्या काही दिवसांपूर्वी नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. विमानतळाला कोणाचं नाव देण्यात यावं यावरुन बरीच मतमतांतरे आहेत. राज्य सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्राला पाठवण्याची तयारी सुरु केली असतानाच. दुसरीकडे स्थानिकांनी मात्र रायगडमधील लोकप्रिय नेते दि. बा. पाटील यांचं नाव विमानतळाला देण्याची मागणी केली. अशातच यावरून पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड एक वक्तव्य केलं आहे.

विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी त्यांच्या समर्थकांनी त्यासाठी आंदोलन सुरू केलं आहे. त्यावरून लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:हून थांबवलं पाहिजे. अन्यथा मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही. ‘मातोश्री’ला घेराव घालण्यात येणार असल्याचा सूचक इशाराच जगदीश गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समर्थन समिती, कल्याण-डोंबिवलीतर्फे शनिवार 17 जूलै रोजी डोंबिवलीतील प्रगती कॉलेजच्या हॉलमध्ये विमानतळ नामकरण परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते.

आतापर्यंत महाराष्ट्रात झालेल्या 19 मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नातेवाइकांची नावं विकासप्रकल्पांना दिलेली नाहीत. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी देखील दि. बा. यांच्या नावाला विरोध केला नसता, असं गायकवाड म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘सर्वोच्च ज्ञानी सोनिया सेनेच्या…’; चित्रा वाघ यांनी उडवली संजय राऊतांची खिल्ली

डॉक्टरांनी जिवंत बाळाला केलं मृत घोषित; अंत्यसंस्कारावेळी जे घडलं त्याने सर्वांनाच बसला धक्का

मुंबईत पावसाचा हाहाकार; विक्रोळीत सहा घरांवर दरड कोसळली, तिघांचा मृत्यू

“दानिश सिद्दिकी यांच्या मृत्यूचा आनंद साजरा करणाऱ्या प्रत्येकाचा नाश होईल”

“अभिनय करून पोटापाण्याचं पहा, फार डोकं चालवू नका”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More