बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

… अन्यथा आंदोलन करण्यात येईल, एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा आक्रमक!

पुणे | गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. तसेच एमपीएससीतून पदे मिळवलेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना अद्याप नियुक्त्या देखील देण्यात आल्या नाहीत. यामुळे एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 जुलैपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्त्या केल्या जातील, असं आश्वासन दिलं होतं. मात्र, या नियुक्त्या अद्याप झाल्या नाहीत. तसेच संयुक्त पूर्व परीक्षेच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या नाहीत. यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. सरकारने दिलेलं आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करावं अन्यथा सोमवारपासून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

एमपीएससी स्टुडंट राईट्सचे महेश बडे याविषयी बोलताना म्हणाले की, अकरावी प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षेसह इतर अनेक परीक्षा ऑगस्ट सप्टेंबर या कालावधीत होत आहेत. मग एमपीएससीच्या रखडलेल्या परीक्षा घेण्यास काय हरकत आहे. विद्यार्थ्यांच्या मनस्थितीचा विचार करुन आयोगाने परीक्षांच्या तारखा जाहीर कराव्यात. अन्यथा सोमवारपासून आंदोलन करण्यात येईल.

दरम्यान, एमपीेएससीच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर एमपीएससीबद्दल राज्य सरकार काय निर्णय घेतंय, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. लवकरच सरकार एमपीएससीबद्दल योग्य निर्णय घेईल, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे.

थोडक्यात बातम्या –

भररस्त्यात तरुणीचा हायहोल्टेज ड्रामा! गाडी चालकाच्या कानाखाली लगावत…; पाहा व्हिडीओ

“भगतसिंह कोश्यारींना समजायला हवं ते मुख्यमंत्री नसून राज्यपाल आहेत”

विरोधी पक्षातील 100 खासदारांच्या बैठकीतील संजय राऊतांचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाले…

“सोनू सूदची समाजसेवा ही फक्त राज्याबाहेरील लोकांपुरतीच आहे का?”

मोठी बातमी! अमित शहा आणि शरद पवार यांची दिल्लीत भेट होणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More