नांदेड महाराष्ट्र

…नाहीतर सत्ताधारी आणि विरोधकांना नागडं करुन मारु; मराठा आंदोलकाचा इशारा

नांदेड | मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली. मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यामुळे मराठा संघटना आक्रमक होताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर छावा संघटनेचे अध्यक्ष नाना साहेब जावळे पाटील यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना इशारा दिला आहे.

सरकारने सर्वोच्च न्यायालयात पूर्णविचार याचिका दाखल करून मराठा आरक्षणाबाबत तात्काळ निर्णय घ्यावा नाहीतर सत्ताधारी आणि विरोधकांना नग्न करून मारू त्यासोबत उग्र आंदोलन करू यामध्ये सार्वजनिक मालमत्तेच नुकसान करणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत नाना साहेब जावळे पाटील यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना इशारा दिला आहे.

मराठी समाजातील अनेक कुटूंबांना शिक्षणाची आणि नोकरीची गरज आहे. उच्च न्यायालयात हे आरक्षण टिकलं होतं त्यामुळे अनेक मराठा समाजाच्या तरूणांना नोकरीत आणि शिक्षणात फायदा झाला मात्र न्यायालयाने स्थगिती दिल्याने समाजात संतापाची भावना असल्याचं मत क्रांती मोर्चाने व्यक्त केलं आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणला स्थगिती मिळल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैैरीचालू आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“ठाकरे ब्रँड हे काय नवीन काढलंय?, राज्यात एकच ब्रँड ते म्हणजे…”

भाजप प्रवक्त्याने मराठी अभिनेत्रींबद्दल केलेल्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर बांदेकर संतापले; म्हणाले…

“देवेंद्र फडणवीसांनी खडसेंच्या रुपात एक ओबीसी नेता संपवला”

“50 वर्षांत शरद पवारांनी मराठा आरक्षण का दिलं नाही?, आरक्षण देण्याची तुमची इच्छा कधीच नव्हती”

‘बॉलिवूडशी नातं सांगणारे वांद्रे पूर्वेला राहतात’; शेलारांचा आदित्य ठाकरेंना टोला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या