मुंबई | 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. याची नोंदणी आज 4 वाजल्यानंतर को-विन अँपवर करता येणार आहे. लस घेण्यासाठी लोकांना को-विन ॲपवर नावाची नोंदणी करावी लागेल. यानंतर लस घेण्याची वेळ आणि दिवस निश्चित केला जाईल.
18 वर्षांवरील लसीकरिता पात्र नागरिकांना को-विन अँप वर नाव नोंदवता येईल. को-विन अॅप वर नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. त्यानंतर एसएमएसदारे त्यावर एक ओटीपी पाठवण्यात येईल. नोंदणी पूर्ण करण्यासाठी व्हेरिफाय बटन वर क्लिक करावं लागेल. नोंदणी झाल्यावर तुम्हाला इतर महत्वाची माहिती विचारण्यात येईल. यात प्रामुख्याने तुमचं नाव, जन्म तारीख, लिंग, ओळखपत्र प्रकार इत्यादींचा समावेश असेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर नोंदणीवर बटन वर क्लीक करा.
एकदा नोंदणी झाली की लसीकरणा संदर्भातील सर्व महत्वाची माहिती एसएमएसद्वारे पाठवण्यात येईल. तसेच लस घ्यायची असल्यास याकरता लसीकरण केंद्र शोधण्यात गूगल सर्च आणि मॅप्सची मदत तुम्हाला घेता येणार आहे.
दरम्यान, को-विन ॲपवर नोंदणी न करता थेट लसीकरण केंद्रावर जाणाऱ्या नाकरिकांना लस दिली जाणार नाही. लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचं कळतंय. त्यामुळे तुम्हाला लस घ्यायची असेल तर आधी को-विन ॲपवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे.
थोडक्यात बातम्या-
समय समय की बात हैं, ज्यांना नागपुरातून बाहेर जा सांगितलं, त्यांना परत येण्यासाठी आर्जव!
मी माझं आयुष्य जगलो म्हणत तरुणाला स्वत:चा बेड देणाऱ्या 85 वर्षीय वृद्धाचं निधन
बायकोच्या प्रियकराबद्दल कळल्यानंतर त्याने उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल
‘मोक्का’ लागलेल्या महिला वकिलाची ससूनच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या
कोव्हिड केअर सेंटरमध्ये महिला डाॅक्टरकडे केली शरीरसुखाची मागणी; आरोपीला अटक
Comments are closed.