लखनऊ | पाकिस्तान सातत्याने अणुबॉम्ब वापराच्या धमक्या देत आहे. त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कमळाचे बटण दाबले तर अणुबॉम्ब थेट पाकिस्तानात आणि कलम 370 ला विरोध करणाऱ्यांवरही पडेल, असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केलं आहे.
ठाण्यातील मानपाडा भागात शनिवारी उत्तर भारतीय संघटनेकडून स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मौर्य आणि ठाणे शहरातील उमेदवार संजय केळकर हे उपस्थित होते. यावेळी मौर्य बोलत होते.
गेल्या 70 वर्षांपासून देशाला कीड लागली होती, ती दूर करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. कलम 370 ही त्यापैकी एक कीड होती, असं मोर्य यांनी सांगितलं.
दरम्यान, मतदान इतक्या मोठय़ा प्रमाणावर व्हायला हवे की मतदान यंत्र हे कमळाच्या चिन्हानेच भरून गेले पाहिजे, असंही मोर्य यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपत्तीत 5 वर्षात 20 पटींनी वाढ! https://t.co/nMIhbx8C7F #DevendraFadnavis
— थोडक्यात (@thodkyaat) October 6, 2019
अखेर चंद्रकांत पाटलांनी पुण्यात भाड्याने घर घेतलं!- https://t.co/Ok3ARm5DHN #म
— थोडक्यात (@thodkyaat) October 6, 2019
आरेच्या मुद्द्यावरून शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार! https://t.co/Bg1o4v75SA @OfficeofUT
— थोडक्यात (@thodkyaat) October 6, 2019
Comments are closed.