औरंगाबाद महाराष्ट्र

“मला असं वाटतंय की मी एका देवाची मुलगी आहे”

बीड | बीडच्या पालवण येथील देवराई प्रकल्पावर आज पहिल्या वृक्ष संमेलनाला सुरुवात झाली. 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनाला बीडकरांनी आणि वृक्ष प्रेमींनी भरभरुन प्रतिसाद दिला. यावेळी वृक्ष संमेलनाचे प्रमुख अभिनेेते सयाजी शिंदे यांच्या लेकीने आपल्या पित्याचं तोंडभरून कौतूक केलं आहे.

मला असं वाटतंय की मी एका देवाची मुलगी आहे. ते खूप महान काम करत आहेत. माझे वडील असून काही उपयोग नाही असं वाटून मला सुरुवातीला वडिलांचा खूप राग यायचा. पण आता मला त्यांचं काम पाहून मी त्यांची मुलगी असल्याबद्दल अभिमान वाटत असल्याचं सयाजी शिंदेंच्या मुलीनं म्हटलं आहे.

दुर्मिळ वनस्पती, गवताळ परिसंस्था, पर्यावरण, खेळ, सेंद्रिय शेती आणि वृक्ष सुंदरी अशा कार्यक्रमाचं आयोजन या वृक्ष संमेलनात करण्यात आलं. यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देखील तेवढ्याच उत्साहानं सहभाग घेतला.

दरम्यान, सयाजी शिंदेंच्या या संकल्पनेतून अनेक संस्था भेट देत असतात. आज त्यांच्या मुलीने संमेलनात हजेरी लावून आपल्या वडिलांचं कौतुक केलं.

ट्रेंडिंग बातम्या-

शिवसेना सत्तेसाठी अजून किती लाचार होणार?- देवेंद्र फडणवीस

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदूरीकर महाराजांना पहिला झटका!

महत्वाच्या बातम्या-

“सावरकरांबद्दल जे लिहिलंय ते ऐतिहासिक वस्तुस्थितीला धरूनच; मासिक मागे घेणार नाही”

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदूरीकर महाराजांना पहिला झटका!

‘सत्ता जाऊन सहा वर्षे झाली तरी अनेकजण मंत्र्यासारखेच वागतात’; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या