मुंबई | प्रसिद्ध अभिनेत्री कंगणा राणावतने काल मंगळवारी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. त्यावेळी तिच्यासोबत मनसेचे मसल मॅन मनीष धुरी हे उपस्थित असल्याने मनसेचा कंगणाला छुपा पाठींबा असल्याचं बोललं जात होतं. मात्र यावर मनीष धुरी यांनी खुलासा केला आहे.
कंगणासोबत आमचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे कौटुंबीक संबंध आहेत. त्यामुळे काल त्यांच्यासोबत देवदर्शनाला गेलो. त्याचा राजकीय संबंध जोडू नये, असं मनीष धुरी यांनी सांगितलं आहे.
मनसेचे आंबोली विधानसभा मतदारसंघाचे विभाग अध्यक्ष मनीष धुरी आणि त्यांचे बंधू कुशल धुरी कंगणासोबत दर्शन घेताना उपस्थित होते. त्यामुळे कंगणाला छुप संरक्षण दिल्याच्या चर्चांणा उधाण आलं होतं. मात्र धुरी यांनी यावर प्रतिक्रिया देत या चर्चांणा पुर्णविराम दिला आहे. अशातच काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी कंगणाची चौकशी कधी करणार असा सवाल एनसीबीला केला आहे.
दरम्यान, डीअर एनसीबी, ती परत आलीये. या व्हिडीओच्या चौकशीसाठी तुम्ही कंगणाला कधी चौकशीसाठी बोलवणार आहात?, असं सचिन सावंत यांनी म्हटं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं असून त्यासोबत कंगणाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
थोडक्यात बातम्या-
दिल्लीतील आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री केजरीवालांनी केली ‘ही’ मोठी घोषणा
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज; वेतनात वाढ, सेवानिवृत्तीचं वयही वाढवलं!
‘आपला तो ‘बाब्या’ दुसऱ्याचा तो….’; निलेश राणेंची शिवसेनेवर टीका
‘मी ड्रग्जच्या आहारी गेले होते’; डीअर एनसीबी, कंगणाला चौकशीसाठी कधी बोलवणार?
‘शिवसेना-राष्ट्रवादी मिळून आपल्याविरुद्ध रणनीती आखताहेत’; काँग्रेस नेत्याचं सोनिया गांधींना पत्र