बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रेल्वे रुळ सोडून आमच्या स्टेशनवर येऊ शकता- उद्धव ठाकरे

औरंगाबाद | आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस आहे. औरंगाबादमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आलं. मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतीकारकांच्या त्यागाला स्मरण करण्याचा हा दिवस आहे.

आजच्या दिवशीच मराठवाड्याला निजामाच्या तावडीतून मुक्तता मिळाली होती. म्हणून औरंगाबाद येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री बाळासाहेब थोरात हे कार्यक्रमाला उपस्थित होते.

रावसाहेब दानवे कार्यक्रमाला आहेत म्हणल्यावर जुगलबंदी तर ठरलेलीच असते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी आपल्या खास शैलीत रावसाहेब दानवे यांची फिरकी घेतली. तसेच मंचावर उपस्थित आजी-माजी आणि पुढे भविष्यात एकत्र आलो तर आमचे भावी सहकारी, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी पहिल्यांदाच भाजपला खुली ऑफर दिल्याचं पहायला मिळालं.

मला रेल्वे का आवडते कारण रेल्वेला रूळ असतात, रूळ सोडून इंजिन कुठेही जात नाही. रुळ सोडून इकडे तिकडे कुठेही जाऊ शकत नाही. त्याला डायव्हर्जन मारलं तर आमच्या स्टेशनवर येऊ शकता, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

थोडक्यात बातम्या 

मनोज पाटीलनं केलेल्या गंभीर आरोपानंतर अभिनेता साहिल खानला अटक!

‘माझे भावी सहकारी…’; भाजपसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

पंतप्रधान मोदींमुळे रांगेतील शेवटच्या व्यक्तीचं कल्याण झालं- चंद्रकांत पाटील

भररस्त्यात डान्स केल्यामुळे माॅडेलवर गुन्हा दाखल, पाहा व्हिडीओ!

…तर आपण कोरोनाची लढाई जिंकू शकतो- निती आयोग

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More