बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अख्खा महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करण्याचं आमचं ध्येय”

रत्नागिरी | राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या राज्यात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरू आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देश, उत्तर महाराष्ट्र असा जवळपास 9 हजार किमीपेक्षा जास्त प्रवास या यात्रेनं केला आहे. ही यात्रा कोकणात पोहोचली आहे. शुक्रवारी जयंत पाटील यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. त्यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

अख्खा महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करण्याचं आमचं ध्येय आहे आणि आम्ही ते तुमच्या मदतीने करणारच असा आत्मविश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. माणसं आपल्याला सोडून गेली म्हणून हतबल व्हायचं नाही. त्यांना जाऊन एक टर्म पूर्ण झाली आतापर्यंत आपलं नवीन संघटन इथं तयार व्हायला हवं होतं, असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

पाटील पुढं बोलताना म्हणाले की, मरगळ झटकून टाकून नव्याने पक्ष बांधणी करा, अशी साद कार्यकर्त्यांना घातली आहे. आपला पक्ष सरकारमध्ये आहे. आपल्याला विकासात्मक कामासाठी जी मदत पाहिजे ती करण्यात येईल. लोकांच्या समस्यांची सोडवणूक करून त्यांच्या मनात स्थान निर्माण करा, असं आवाहन देखील जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

दरम्यान, विकासाच्या बाजूने उभा राहणारा मोठा गट रत्नागिरीमध्ये आहे. तसेच शरद पवार यांच्यावर प्रेम करणारा लोक या भागात आहेत. लोकांनी आपल्या उभं राहण्यासाठी काम करा. मला खात्री आहे, की लोक आपल्या बाजूने उभं राहतील, असं राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांनी या संवाद यात्रेमध्ये म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

‘MPSCच्या ‘त्या’ उमेदवारांना आणखी दोन संधी द्या’; संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

अन् न्यायालयाने दिले थेट जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्याचे आदेश

ठाकरे सरकारकडून ओबीसी विद्यार्थ्यांना दिवाळी गिफ्ट; शिष्यवृत्तीसाठी ‘इतके’ कोटी मंजूर

“चंद्रकांत पाटील हल्ली झोपेतही बोलतात, असं कानावर आलंय”

‘शेतकऱ्यांना लुटल्यावर हातपाय जोडणार नाही, तर थेट…’; वरूण गांधी आक्रमक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More