बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आमचं घर’ काही दिवसांपासून संकटात आहे, प्राजक्ता माळीचा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ

मुंबई | मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या मनमोहक अदांमुळे अनेक लोकांच्या मनावर राज्य करत आहे. अशातच तिच्या एका व्हिडीओने अनेकांचं मन जिंकलं आहे. ‘आमचं घर’ संकटात असून यासाठी मदतीची मागणी करत असतानाचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ प्राजक्ताने शेअर केल्यानंतर चाहत्यांचं तिच्यावरचं प्रेम आता फारच वाढल्याचं दिसून येत आहे.

ठाण्यामध्ये ‘आमचं घर’ अशी एक संस्था आहे. ही संस्था अनाथ मुलांसाठी, गरीब बांधवांसाठी तसेच वृद्धांसाठी त्यांचा आधार बनून काम करते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ही संस्था संकटात असून यांना आता मदतीची गरज असल्याचं प्राजक्ताने तिच्या व्हिडीओमधून सांगितलं आहे.

याबाबतचा एक व्हिडीओ प्राजक्ताने तिच्या इन्स्टा अकाऊंटवरुन शेअर केला आहे. यामध्ये तिने लोकांकडे या संस्थेसाठी मदत मागितली आहे. तसेच करण्यात येणारी मदत ही गरजूंपर्यंत पोहचेल याची शाश्वती देखील प्राजक्ताने यामधून दिली आहे. प्राजक्ताच्या या व्हिडीओवर अनेकांनी मदत करेल, असं आश्वासन देखील दिलं आहे.

दरम्यान, प्राजक्ता केवळ अभिनयामध्येच नाही तर नृत्यामध्ये देखील तितकीच हुशार असून तिने भरतनाट्यममध्ये अरंगेत्रम आणि विशारद देखील पुर्ण केलं आहे. सध्या प्राजक्ता तिच्या इन्स्टावर प्रचंड सक्रीय आहे. तसेच तिच्या लाईफ अपडेट्स ती तिच्या इन्स्टावरुन तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवत आहे.

पाहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

थोडक्यात बातम्या-

अनेक दिग्गज मंत्र्यासोबत काम करणारे विशेष अधिकारी राम खेडेकर यांचं निधन

संतापजनक! इन्स्टाग्राम स्टिकरमध्ये शिवशंकरांच्या हातात वाईनचा ग्लास, इन्स्टाग्रामविरूद्ध तक्रार दाखल

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! फक्त ‘एवढ्या’ दिवसांत तब्बल 53 हजार रूग्ण कोरोनामुक्त

‘मुंबई पुण्याला तिसऱ्या लाटेचा धोका नाही’; तज्ज्ञांनी सांगितलं ‘हे’ मोठं कारण

डाळिंब निर्यातीवर लॉकडाऊनची कुऱ्हाड; कोट्यवधींची उलाढाल ठप्प

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More