बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशाच्या न्यायव्यवस्थेबाबत सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

नवी दिल्ली | देशातील मोठ्या प्रमाणात नागरिक न्यायाच्या प्रतिक्षेत असतात. भारतीय न्यायप्रणाली ही आपल्या देशात सर्वोच्च स्थानी आहे. आपल्या लोकशाहीत न्यायव्यवस्थेला फार महत्व आहे. सामान्य नागरिक न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतात. भारतीय  न्यायालयाची कार्यपद्धती आणि निकालाला होणारा उशीर यामुळे सतत न्यालयावर जनतेकडून टीका होते. अशात सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी न्यायव्यवस्थेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी आता स्पष्ट शब्दात न्यायालयांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहे. आपली न्यायव्यवस्था इंग्रजांच्या काळातील आहे आणि तिच्या भारतीयकरणाची आवश्यकता आहे, असं म्हटलं आहे. या त्यांच्या वक्तव्यावरून सरन्यायाधीश पुन्हा चर्चेत आहेत.

बंगळुरुमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, देशात अजूनही गुलामीच्या काळातील व्यवस्था कायम आहे आणि ती आपल्या लोकांसाठी योग्य नाही. देशातील नागरिकांकडून न्यायालयाच्या निकालावर आणि कार्यपद्धतीवर बोललं जात असताना आता थेट सरन्यायाधीश यांनी बोलल्याने हा विषय चर्चेत आला आहे.

सरन्यायाधीश म्हणाले की, गावाकडील लोकांना न्यायप्रणाली अजुनही समजलेली नाही.  सध्याची व्यवस्था उपनिवेशिक काळातील आहे, जी आपल्या लोकांसाठी चांगली नाही. आपल्याला आपल्या न्याय व्यवस्थेचं भारतीयकरण करण्याची आवश्यकता आहे. आपण समाजाची वास्तविकता स्विकारुन न्यायव्यवस्थेला स्थानिक गरजांनुसार तयार करणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले.

थोडक्यात बातम्या 

“आमदार प्रणिती शिंदे लवकरच कॅबीनेट मंत्री होणार”

…म्हणून मी म्हणालो माजी मंत्री म्हणू नका- चंद्रकांत पाटील

‘बिग बाॅस’ होस्ट करण्यासाठी सलमान खानने घेतले ‘इतके’ कोटी!

नरेंद्र मोदी यांचा पत्रकार परिषद न घेण्याचा गुण मला जास्त आवडतो- प्रीतम मुंडे

राजकारण हा फार सिरीयस बिझनेस- देवेंद्र फडणवीस

दोन सख्ख्या भावांवर काळाचा घाला; अचानक वायर तुटली अन् होत्याचं नव्हतं झालं, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More