अहमदनगर महाराष्ट्र

“आमच्या नेत्यांमध्ये दोन काय, चार बायका सांभाळण्याची ताकद”

अहमदनगर | ज्या नवऱ्यामध्ये दोन बायका बायका संभाळण्याची ताकद असते, तो दोनच काय चार बायकाही सांभाळू शकतो. आमचे नेतेही त्या ताकदीचे आहेत, असं प्रत्युत्तर शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी माजी मंत्री राम शिंदे यांना दिले आहे.

नगर जिल्ह्यात विविध ठिकाणी भाजपतर्फे शनिवारी दूध आंदोलनं झाली. या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथे झालेल्या आंदोलनात माजी मंत्री राम शिंदे यांनी सरकारवर टीका केली.

एका नवऱ्याच्या दोन बायका असं हे तिघाडी सरकार आहे. त्यांना शेतक-यांचे काहीही घेणंदेणं नाही. त्यांचं सर्व आटोपलं असून कारभारी घरात बसून प्रपंच कसा चालणार? हे सरकार सर्व आघाड्यावर अपयशी ठरलं असून ते कधी कोसळेल हे सांगता येत नाही, असं राम शिंदे म्हणाले.

दरम्यान, दूध उत्पादक व्याकुळ झाले आहेत, ही खरी गोष्ट आहे. दुग्धजन्य पदार्थांना मार्केट मिळत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने व राज्य सरकारने निर्यातीला प्रोत्साहन म्हणून अनुदान दिलं पाहिजे, असं सदाशिव लोखंडे यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं प्रदीर्घ आजारानं निधन

मटका किंग मुन्ना उर्फ जिग्नेश ठक्कर याची त्याच्याच ऑफिससमोर गोळ्या घालून हत्याॉ

‘साहेब झोपूनच असायचे रिया मॅडम मात्र…’ सुशांतच्या बाॅडिगार्डचे धक्कादायक खुलासे

आत्महत्येच्या रात्री नक्की काय घडलं?; सुशांतच्या मित्राने केला खुलासा

‘सुशांत संशयास्पद औषधं घेत होता’, जीम ट्रेनरचा धक्कादायक खुलासा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या