बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोणालाही द्यायला आमचं ऑफर लेटर असंच मैदानात पडलेलं नाही”

मुंबई | सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून आरोप-प्रत्यारोपांची खेळी सुरु आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीम यांनी पत्रकार परिषदेत घेत त्यांच्यावरील आरोप उधळून लावले आहेत. याशिवाय त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरही निशाणा साधला आहे.

पत्रकार परिषदेत मुश्रीफ यांनी म्हटलं की, मला भाजपमध्ये येण्याची ऑफर देखील चंद्रकांत पाटील यांनी मला दिली होती. त्यांच्या या वक्तव्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हसन मुश्रीफ यांना कोणी ऑफर लेटर दिलं? ऑफर घेऊन आम्ही कुठेही फिरत थोडी असतो. कोणालाही द्यायला आमचे ऑफर लेटर असंच मैदानात पडलेलं नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मुश्रीफ यांचा जोरदार समाचार घेतला आहे.

हसन मुश्रीफ यांनी म्हटलं होतं की, मला भाजपमध्ये येण्याची ऑफर देखील चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. चंद्रकांत पाटलांनी पुरुषार्थाप्रमाणे लढावं, कुणाचा वापर करुन, माझ्या कुटुंबाची बदनामी करुन काही मिळणार नाही, सगळे आरोप खोटे आहेत.

दरम्यान, किरीट सोमय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सरकारवर टीकास्त्र सोडलं. त्यानंतर काही वेळातच मुश्रीफ यांनीही पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर झालेले आरोप खोटे असल्याचं सांगितलं आहे. आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून अनेक आरोप-प्रत्यारोप होत असलेले पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या – 

“शरद पवारांचं नाव घेण्याची त्यांची लायकी आहे का?”

“शिवसेना आणि आमचं फेव्हिकॉलचं नातं, दिवार तुटणार नाही”

कर बुडवल्याच्या आरोपावर सोनू सूदची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

“कायद्याची लढाई कायद्यानं लढा कोल्हापूरी चपलेनं लढू नका”

‘येत्या दोन दिवसात…’; चंद्रकांत पाटलांचा खळबळजनक दावा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More