बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“विदर्भात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आमचा पक्ष मोठा”

मुंबई | नुकतंच भाजपच्या प्रदेशाध्यक्षापदी चंद्रशेखर बावनकुळे((Chandrashekhar Bawankule) आणि मुंबईच्या प्रदेशाध्यक्षापदी आशिष शेलार(Ashish Shelar) यांची नियुक्ती करण्यात आली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे यांच्या कामाचा आवाका पाहता आमच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी दिली, असं फडणवीस म्हणाले.

ओबीसींच्या प्रश्नावर बावनकुळे सातत्याने लढले आहेत, ज्यावेळी ओबीसी आरक्षण गेलं. त्यावेळी बावनकुळे यांनी प्रयत्नांची शर्थ केली. ते ओबीसींचा चेहरा आहेत. विदर्भात तर आमची जास्त ताकद होतीच, पण आता पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मुंबई आणि मराठवाड्यातही आम्ही मोठा पक्ष आहोत, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, फडणवीस यांनी राज्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानाची आकडेवारी गोळा करणं सुरू आहे. लवकरच सर्वांना नुकसान भरपाई मिळेल, असं अश्वासनही फडणवीस यांनी दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! जात पडताळणी समितीचा समीर वानखेडेंना दिलासा

नवऱ्यानेच भर मंडपात लावला बायकोचा सेक्स व्हिडीओ, व्हायरल क्लीपने मोठी खळबळ

“विरोधी पक्षापेक्षा मित्रपक्षांना संपवणं हेच भाजपच धोरण”

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळेंची नियुक्ती

“…मग मी पण म्हणायचं का शिवसेना माझी आहे?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More