Top News महाराष्ट्र मुंबई

‘आमचे लोक तुम्हाला त्रास तर देत नाहीत ना?’; सोनिया गांधींच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले…

मुंबई | महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पुर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही, या पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रम होता. यावेळी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांच्यातील फोनवर झालेल्या बातचीतीबद्दलचा किस्सा सांगितला.

सोनिया गांधी फोनकरून विचारात असतात की काम कसं चाललंय?, आमची लोक तुम्हाला त्रास तर देत नाही ना?, असं उद्धव ठाकरेंनी म्हटल्यावर तेथील उपस्थितांमध्ये एकच हषा पिकला.

त्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, मी सोनियांकडे तुमची बाजू लावून धरतो. तिथ मी मागे हटत नाही. असं म्हणत आपण काँग्रेस नेत्यांचं सोनिया गांधींकडे कौतूक करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्य सरकारच्या या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.

 

महत्वाच्या बातम्या-

“…तर चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा”

‘…त्यामुळे जास्त उडू नकोस, मी कंगणा राणावत आहे’; शेतकरी आंदोलनावरुन कंगणा-दिलजीतमध्ये जुंपल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अबोल असले तरी चतुर आहेत- शरद पवार

कंगणा राणावतचं ट्विटर हँडल बंद करण्यात यावं यासाठी हायकोर्टात याचिका दाखल!

खळबळजनक! मुंबईत 2 लेकींची हत्या करून वडिलांनी संपवलं आयुष्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या