सांगली | पाकिस्तानला सगळ्यात वेगवान चेंडू फेकणारा पंतप्रधान मिळाला आहे, तर आम्हाला सर्वात जास्त फेकणारा पंतप्रधान भेटलाय, अशी खोचक टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. ते सांगलीत बोलत होते.
जगातील वेगवान गोलंदाज पाकिस्तानचा पंतप्रधान होणार असल्याचे एका पाकिस्तानी पत्रकाराने लिहले आहे. पण मी सांगतो जेवढ्या वेगात इम्रान खान चेंडू फेकत नसतील तेवढ्या वेगात आमचे पंतप्रधान फेकतात. त्यांची बरोबरी तुमचे इम्रान खान करू शकणार नाहीत, असं ते म्हणाले.
दरम्यान, अशा फेकू सरकारला तुम्ही मतदान करणार आहात का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
महत्त्वाच्या बातम्या–
-सरकारच्या आश्वासनानंतरही पुण्यात मराठ्यांचा एल्गार!
-800 फूट दरीतून वर आल्यावर मिळाली रेंज; त्यानंतर दिली अपघाताची माहिती
-“मराठा आमदार जास्त म्हणून आवाज उठवला; मुस्लीम आरक्षणाचं काय?”
-राज्य सरकार सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार नाही
-शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांना त्यांच्याच मुलाने लावला चुना!