देश

“आम्ही तयार केलेल्या रस्त्यांवर 200 वर्ष तरी खड्डे पडणार नाहीत”

लखनऊ | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात तयार झालेल्या रस्त्यांवर पुढील 200 वर्ष तरी खड्डे पडणार नाहीत, असा दावा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. अयोध्येमध्ये भूमीपुजनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

रस्ते तयार करताना आम्ही गुणवत्तेसोबत, कंत्राटदार यांच्यासोबत कोणतीही तडजोड करणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

मोदींच्या सत्ताकाळात तयार झालेले रस्ते दिर्घकाळ टिकतील. गेल्या 70 वर्षांमध्ये जे झालं नाही ते आम्ही 5 वर्षांमध्ये केलं आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अयोध्येमध्ये येऊन गडकरींनी राम मंदिरावर बोलणं टाळलं. त्यांनी विकासकामांवर भाष्य केलं.

महत्वाच्या बातम्या-

बिहारचे युवक नसते तर महाराष्ट्राचे कारखाने बंद झाले असते- सुशीलकुमार मोदी

-कोल्हापूरची जागा काँग्रेसनं स्वत:कडे घ्यावी- सतेज पाटील

अटलजी ‘महाभेसळी’चं सरकार चालवायचे काय?; काँग्रेसचा मोदींवर पलटवार

विधानसभा आणि लोकसभा एकत्र होतील का?, विनोद तावडे म्हणाले…

‘काळे पान! बाके बडवून सत्य मरेल काय?’, शिवसेनेचा ‘राफेल’वरुन निशाणा

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या