बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणून आपल्याकडच्या महिलांनी फिगर गमावली असून जाड झाल्या’; या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

मुंबई | येत्या काही महिन्यांवर पाच राज्यातील विधानसभा निवडणुका आल्या आहेत. सर्व पक्ष आतापासूनच तयारीला लागले आहेत. प्रचारसभांना सुरूवात झाली असून आपल्या पुर्ण ताकदीनिशी पक्ष मैदानात उतरले आहेत. मात्र नेतेमंडळी प्रचार सभांवेेळी वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहे. अशातच तमिळनाडूमधील द्रमुकचे नेते दिंडिगल लिओनी यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

तुम्हाला माहिती आहे का, अनेक प्रकारच्या गायी असतात. शेतामध्ये तुम्हाला हल्ली परदेशी प्रजातीच्या गायी दिसतील. लोकं या गायींसाठी दूध काढायचं मशिन वापरतात. दिवसाला 40 लिटर दूध मिळतं. ते दूध प्यायल्यामुळे आपल्या सगळ्या महिला फुग्याप्रमाणे जाड झाल्या असल्याचं दिंडिगल लिओनी  म्हणाले. द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे नेते असून कोइम्बतूरमध्ये पक्षाचे उमेदवार कार्तिकेय सिवसेनापती यांच्या प्रचारावेळी ते बोलत होेते.

आधी महिलांची फिगर इंग्रजीमधील आठ आकड्यासारखी होती. मुलांना त्या कंबरेवर ठेवायच्या पण आता जर त्यांनी मुलांना तसं ठेवलं तर मुलं देखील घसरून पडतील. कारण महिला आता बॅरलसारख्या झाल्या आहेत. आपली सगळी मुलं देखील जाड झाली आहे, असं वादग्रस्त वक्तव्य लिओनी यांनी केलं आहे.

दरम्यान, दोन दिवसांपुर्वी पश्चिम बंगालचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी तृणमुल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ममता दीदींनी साडीऐवजी बर्मुडा घालावा, म्हणजे त्यांचा पाय व्यवस्थित दिसेल, असं दिलीप घोष म्हणाले होते. प्रचार करावा मात्र आपण काय बोलतो यांचं भान राजकीय नेत्यांनी ठेवायला हवं.

 

थोडक्यात बातम्या-  

महाराष्ट्र पुन्हा लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर; ‘या’ जिल्ह्यातही आजपासुन कडक लाॅकडाऊनचे आदेश!

धक्कादायक! विद्यापीठाच्या आवारातच पाहत होते शिक्षक आणि कर्मचारी पॉर्न फिल्म

मुकेश अंबानी स्फोटकं प्रकरणात अटक झालेल्या सचिन वाझेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

सचिन वाझेच्या घरात 62 जिवंत काडतुसं सापडली; NIA चा मोठा खुलासा

आव्हाडांनी रश्मी शुक्लांवर केलेल्या गंभीर आरोपांवर प्रविण दरेकर म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More