सर्वत्र उत्तर प्रदेशचाच बोलबाला, देशातील 24 बोगस विद्यापीठांपैकी 8 विद्यापीठे उत्तर प्रदेशची
नवी दिल्ली | शिक्षण हे सामाजिक उन्नतीसाठी व देशाच्या विकासासाठी सर्वात मोठं माध्यम आहे. शिक्षणच पिचलेल्या, खचलेल्या, खितपत पडलेल्या समाजाला वर उचलुन घेते. शिक्षणाच्या बळावरच दुर्लक्षित, अविकसित प्रदेशांचा विकास होत असतो. पण हेच शिक्षण पैसा कमवण्याचं माध्यम झालं तर देशाचं किती नुकसान होईल, अन् झालंय ही तसंच आणि याचा खुलासा खुद्द केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे.
उत्तर प्रदेशमधील 8 विद्यापीठे यामध्ये वाराणसी संस्कृत, महिला ग्राम विद्यापिठ, गांधी हिंदी विद्यापीठ, नेॅशनल युनिवर्सिटी ऑफ इलेक्ट्रो काॅम्प्लेक्स होमिओपॅथी, नेताजी सुभाषचंद्र बोस मुक्त विद्यापीठ, उत्तर प्रदेश विद्यापीठ, महाराणा प्रताप शिक्षण निकेतऩ विद्यापीठ, इंद्रप्रस्थ शिक्षण विद्यापीठ तर दिल्लीतील 7 विद्यापीठे यामध्ये कमर्शिअल विद्यापीठ, युनायटेड नेशन्स विद्यापीठ, प्रोफेशनल विद्यापीठ, एडीआर-फोकस्ड न्यायीक विद्यापीठ, विज्ञान व तंत्रज्ञान संकुुुुुुुुुुल, विश्वकर्मा विद्यापीठ हे आहेत.
ओडीशामध्ये नवभारत शिक्षण परिषद, उत्तर ओडीशा कृषी तंत्रज्ञान विद्यापीठे ही दोन बोगस विद्यापीठे आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये इंडियन इन्स्टीट्युट ऑफ अल्टरनेटीव मेडीसिन व इंडियन इन्स्टीट्युट ऑफ अल्टरनेटीव मेडीसिन रिसर्च हे दोन विद्यापीठ तसेच महाराष्ट्रातील नागपुर येथील एका विद्यापीठाचा समावेश आहे. तसेच कर्नाटक, केरऴ, पुद्दुचेरी व आंध्रप्रदेशमधील राजा अरबी विद्यापीठ यांचा सुध्दा बोगस यादीत समावेश आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संसदेतील लेखी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली आहे. विद्यार्थी-पालक, सामान्य जनता, इलेक्ट्रॅानिक व प्रिंट मिडीयाकडुन आलेल्या तक्रारींच्या आधारे युजीसीकडुन ही कार्यवाही झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
थोडक्यात बातम्या
चेहऱ्यावरच्या तेलकटपणासाठी ‘हा’ फेसपॅक अत्यंत गुणकारी
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; अशोक चव्हाणांनी दिली महत्वाची माहिती
आज सह्याद्रीवर बैठक पार पडणार, ठाकरे सरकार घेणार महत्वाचे निर्णय!
“मंदिरं उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो”
खेळत-खेळत चिमुकला आला रस्त्यावर, भरधाव वेगात मागून गाडी आली अन्…, पाहा व्हिडीओ
Comments are closed.