बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् भीतीपोटी आईने काळजाच्या तुकड्याला सोपवलं सैन्याकडे; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

नवी दिल्ली | अफगाणिस्तानमध्ये गेल्या 20 वर्षांपासून असलेलं अमेरिकी सैन्य मागे घेतल्यानंतर तालिबानने पुन्हा अफगानिस्तावर कब्जा मिळवला आहे. काबुलमध्ये तालिबानी सैन्य पोहोचताच अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घणी यांनी पळ काढला आहे. त्यानंतर आता अफगाणिस्तानचे नागरिक देशाच्या बाहेर पडण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे विमानतळाजवळ विदारक चित्र समोर येताना दिसतंय.

काबुल आणि कंधार विमानतळावर अफगाणी नागरिकांनी लांबच्या लांब रांगा लावल्या आहेत. हे सर्व लोक अफगाणिस्तानातून बाहेर जाण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु कंधार विमानतळावर आता तालिबानने कब्जा केला आहे. तर काबुल विमानतळ आता अमेरिकन सैन्याच्या ताब्यात आहे. त्यामुळे भारतातील तसेच अन्य विदेशी नागरिकांना काबूल विमानतळावरून सुरक्षित बाहेर काढण्यात यश आहे. त्यातच आता एक धक्कादायक व्हिडीओ समोर येतोय.

काही अफगाणी नागरिकांना देश सोडता येणार नाही हे माहिती आहे. त्यामुळे अफगाणी नागरिक आपल्या लहान मुलांना अमेरिकन सैन्याकडे सोपवताना दिसत आहे. आपलं नाही तर आपल्या मुलांचं भविष्य चांगलं व्हावं, या उद्देशाने आपल्या काळजाच्या तुकड्याला अफगाणी सैन्याकडे सोपवताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये लहान मुलांच्या हाताला धरून काटेरी कुंपणाच्या वरून सैन्याकडे सोपवत आहेत.

दरम्यान, अमेरिकेच्या बचाव आणि मदत मोहिमेअंतर्गत अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानात मदत पोहोचवताना दिसत आहे. तर अमेरिकन सैन्य मदत करत असले तरी भरपूर अडचणींचा सामना अमेरिकन सैन्याला करावा लागत आहे. तर दुसरीकडे अफगाणी नागरिक देखील विमानांकडे डोळे लावून बसले आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

मनसेनं अमोल मिटकरींना बिस्कीट आणि श्वान दिलं गिफ्ट!

“दोन मोठी माणसं बोलताना आपलं तोंड मिटून ठेवावं”

“…आता थांबणं शक्य नाही, शेतकऱ्यांनो पायातलं हातात घ्या”

सख्खा भाऊ पक्का वैरी!, अश्रफ घनींचा भाऊच तालिबान्यांना मिळाला!

राज ठाकरेंनी बाबासाहेब आंबेडकरांचं ‘एनिहिलेशन ऑफ कास्ट’ पुस्तक वाचावं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More