बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात ‘कोरोना’चा उद्रेक

यवतमाळ | यवतमाळ जिल्ह्यात कोरोनामूळे एका जणाचा मृत्यु झालेला असून 161 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिमध्ये यवतमाळातील 70 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. गुरुवारी पॉझिटीव्ह आलेल्या 161 जणांमध्ये 89 पुरुष आणि 72 महिलांचा समावेश आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 175 जणांनी यशस्विरीत्या कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

गुरुवारी एकूण 1 हजार 213 अहवाल मिळाले. यापैकी 161 जण नव्याने पॉझिटीव्ह आले तर 1052 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात सध्या 1 हजार 726 ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 18 हजार 402 झाली आहे. 24 तासात 175 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 16 हजार 206 आहे.

दरम्यान, जिल्ह्यात एकूण 470 मृत्युची नोंद झाली आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 1 लाख 67 हजार 705 अहवाल पाठविले असून यापैकी 1 लाख 66 हजार 358 अहवाल मिळाले तर 1 हजार 347 अजून मिळाले नाहीयेत. 1 लाख 47 हजार 956 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

थोडक्यात बातम्या –

मास्क का वापरायचा नाही याचं ठोस कारण राज ठाकरेंनी सांगावं- संजय राऊत

‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌नवऱ्याने ‌व्हाॅटसअॅपला तिचा डीपी न ठेवल्याने पत्नीने केलं असं काही की….

सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणात एन.सी.बी आरोपपत्र दाखल करणार, रिया चक्रवर्ती मुख्य आरोपी!

‘जैश ए हिंद या नावानं…’; अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकं प्रकरणी फडणवीसांचा गंभीर आरो

कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी… अमृता फडणवीस यांच नवं गाणं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More