बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं! मराठवाड्यापाठोपाठ आता विदर्भात Omicronचा शिरकाव

उस्मानाबाद | दक्षिण आफ्रीकेतून समोर आलेला ओमिक्रॉन (B.1.1.529) व्हेरियंटने सर्वच जगाची चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरियंटचा (Omicron variant) पहिला रूग्ण कल्याण डोंबिवली येथे आढळला होता. त्यातच आता चिंतेची बाब म्हणजे राज्यातील ओमिक्रॉन कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidarbha) ओमिक्रॉन व्हेरियंट रूग्णसंख्येत वाढ होत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. उस्मानाबादमध्ये ओमिक्रॉन दोन रूग्ण आढळून आले आहेत. युएई येथून आलेल्या कोरोना रूग्णाचा रिपोर्ट ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आल्याने बावीमध्ये कलम 144 लागूू करण्यात आलं आहे. याठिकाणी 5 कोरोना रूग्ण असून त्यापैकी 2 जणांचे कोरोना रिपोर्ट ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आले आहेत तर 3 जणांचे रिपोर्ट बाकी आहेत.

राज्यतील ओमिक्रॉन रूग्णसंख्या 31 पर्यंत पोहोचली आहे. तसेच बुलढाण्यात देखील ओमिक्रॉन व्हेरिएंटचा एक रूग्ण आढळला आहे. या कारणास्तव मराठवाडा आणि विदर्भातील निर्बंध आणखी कडक होण्याची शक्यता आहे. मंगळवारी एकाच दिवसामध्ये राज्यात ओमिक्रॉन 8 रूग्ण सापडले आहेत.

दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (State Health Minister Rajesh Tope) यांनी आरटीपीसीआर (RTPCR) चाचण्यांचे खाजगी प्रयोगशाळेचे दर आजपासून कमी करण्यात येत असल्याचं सांगितलं आहे. तसेच विमानतळ आणि रेल्वे स्टेशनवर अतिशीघ्र चाचणीसाठी 4500 रूपये या अगोदर निश्चित करण्यात आला होता तो दर आता 1 हजार 975 इतका ठेवण्यात आला आहे. थरमोफिशरचा देखील 1 हजार 975 करण्यात आले असून हे दर भविष्यात आणखी कमी करण्यात  येतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

“…म्हणून ओबीसी आरक्षण धोक्यात आलंय”; पंकजा मुंडेंची घणाघाती टीका

‘ती’ वाईट बातमी आली अन् राजनाथ सिंहांनी भाषण थांबवलं

पोर्नोग्राफी केस: अश्लील व्हिडीओ प्रकरणी राज कुंद्राला न्यायालयाचा मोठा दिलासा

83च्या ‘त्या’ मिस्ट्री बाॅलची कहाणी 38 वर्षांनंतरही उलघडली नाही; पाहा व्हिडीओ

“शकुनी काकांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या सरकारकडून आरक्षण मिळणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More