बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केरळमध्ये पावसाचा हाहाकार! भूस्खलनात शेकडो नागरिक दबल्याची भीती तर 26 जणांचा मृत्यू

त्रिवेंद्रम | केरळमध्ये सध्या पावसानं रौद्र रूप धारण केलं आहे. केरळमधील एकूण सातपेक्षा अधिक जिल्ह्यात पावसानं अक्षरश: जनजीवन विस्कळीत केलं आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांना स्थलांतरित केलं जात आहे. अजूनही पावसाचा जोर कायम असल्यानं राज्य सरकार केंद्र सरकारच्या मदतीनं विस्थापितांची सोय करत आहे.

मुसळधार पाऊस आणि भुस्खलनामुळं राज्यात आतापर्यंत 26 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक नागरिक बेपत्ता आहेत. भुस्खलनाच्या खाली शेकडो नागरिक दबल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. कोट्टायममध्ये पावसाचा जोर सर्वाधिक आहे. या भागात आतापर्यंत 13 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.

हवाई दलाच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येत आहे. एनडीआरएफच्या एकूण 11 टीम मदतकार्य करत आहेत. नागरिकांना शक्य तेवढ्या सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत आहे. कोट्टायम भागातील सर्व नद्यांना महापूर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पी.विजयन यांच्याशी संपर्क साधत केंद्र सरकारकडूम मदतीची ग्वाही दिली आहे.

दरम्यान, केरळमधील परिस्थिती अधिक बिघडण्यापुर्वी राज्य सरकार नागरिकांना काळजी घेण्यास सांगत आहे. आणखीन 48 तास पावसाचं प्रमाण असंच राहाण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे केरळात महापूराचं संकट आणखीनच वाढताना दिसतंय.

थोडक्यात बातम्या 

निवडणुकीआधी भाजपला खिंडार! ‘हा’ मोठा नेता पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर

T-20 वर्ल्ड कपआधी सौरव गांगुलीचा टीम इंडियाला सल्ला, म्हणाला…

रक्षकच ठरला भक्षक! वडिलाने केला अवघ्या 11 वर्षाच्या मुलीवर वारंवार बलात्कार

दिवाळीत कांदा पुन्हा रडवणार, कांद्याच्या भावात अचानक वाढ; जाणून घ्या कारण

‘भारताला हारव नाहीतर तुला पाकिस्तानात एन्ट्रीच नाही’; सामन्याआधी बाबर आझमला धमकी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More